

लोगो ः महापालिका
शहरातील २९ हॉटस्पॉटमघ्ये पाण्याचा होणार निचरा
पूरनियंत्रण प्रकल्पात मंजुरी ; २५२ क्रॉस ड्रेनेज, पावणेदोन लाख लावणार झाडे, चेक डॅम, गाळाचा उपसा
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २५ ः शहराच्या पूरनियंत्रणासाठी सुचवलेल्या ५२४ कोटींच्या विविध प्रकल्पांना शासनाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. त्यामध्ये २९ हॉटस्पॉटच्या ठिकाणच्या पाण्याचा निचरा, २५२ क्रॉस ड्रेनेज तसेच रंकाळा, कोटीतीर्थ तलावांच्या नाल्यांबरोबरच इतर नाल्यांसाठी १७ किलोमीटर लांबीची रिटेनिंग वॉल अशा ३०३ कोटींच्या कामांचा समावेश आहे. याबरोबरच शिवाजी विद्यापीठ, शेंडा पार्क परिसरात तसेच हद्दीबाहेरही प्रकल्प राबवण्यात येणार आहेत. तलाव-नाल्यातील गाळ काढणे, चेक डॅम बांधणे, पक्के तसेच दगडांचे कच्चे बंधारे बांधणे, कळंबा तलावाच्या सांडव्याला दारे, पावणेदोन लाखांवर झाडांचे वृक्षारोपण आदींची कामे केली जाणार आहेत.
जागतिक बँकेच्या सहायाने महाराष्ट्र प्रतिसादक्षम विकास कार्यक्रम (एमआरडीपी) अंतर्गत विविध उपाययोजनांबाबत प्रकल्प राबवण्यात येत आहे. त्यात कोल्हापुरातील विविध प्रकल्पांचा समावेश आहे. त्यासाठी बॅंकेच्या पथकाकडून पाहणी करून आराखडा तयार केला होता. त्यानुसार ‘मित्रा’ संस्थेच्या माध्यमातून विविध विकास कामे अंतिम केली होती. त्यांना शासनाने मान्यता दिली आहे.
दृष्टिक्षेपात...
भुयारी व खुली बॉक्स गटारी बांधणे- ३६ कोटी ६४ लाख ६० हजार
विविध संस्थांच्या रेन वॉटर हार्वेस्टींगसाठी- १ कोटी ३४ लाख ९ हजार
शहरांतर्गत विविध एकूण कामे ४३५ कोटी ३९ लाख ५३ हजार
एकूण रक्कम ४३७ कोटी २९ लाख ९३ हजार
जीएसटी- ७८ लाख १६ हजार
देखरेख- ८ कोटी ७४ लाख ५९ हजार
........
चौकट
२५२ क्रॉस ड्रेनेज
क्षेत्र*कामे*निधी
ए झोन*२७*१२ कोटी ३० लाख ०९
बी झोन*७*३ कोटी ५२ लाख ९७ हजार
सी झोन*५२*३१ कोटी ११ लाख ४४ हजार
डी झोन*४५*१७ कोटी ८६ लाख ७७ हजार
ई झोन*६* २ कोटी ३२ लाख ५२ हजार
............
चौकट
नाला व तलाव गाळ काढणे
कळंबा*१७ कोटी ५७ लाख ५३ हजार
गेट व चॅनेल बांधणे*५ कोटी ५३ लाख २९ हजार
परताळ्यातील गाळ काढणे*५ कोटी ३२ लाख ४३ हजार
नाल्यातील गाळ काढणे*१२ कोटी २१ लाख ५८ हजार
एकूण*४० कोटी ६४ लाख ८४ हजार
...........
चौकट
शिवाजी विद्यापीठ परिसर
पाणी अडवण्यासाठी २५ चरी* ८ लाख ९४ हजार
-
गाळ काढणे
संगीत विभाग* १ कोटी १० लाख ३९ हजार
भाषा भवन* १ कोटी ८२ लाख ४७ हजार
सिमेंट चेक डॅम*१ कोटी ८७ लाख ७८ हजार
राजाराम तलाव*४ कोटी ४१ हजार
एकूण*११ कोटी ४६ लाख ४ हजार
...........
चौकट
नाला परिसरातील कामे
गोमती नाला*१० कोटी ६२ लाख २९ हजार
जयंती नाला*१७ कोटी २० लाख ५१ हजार
.........
चौकट
शहराबाहेरील विविध कामे
पाणी अडवण्यासाठी १०० चरी ०३५ लाख ७६ हजार
१ लाख २० हजार झाडे लावणे*७९ लाख ३८ हजार
दगडाचे बंधारे घालणे*७५ लाख २५ हजार
........
ठळक चौकट
शेंडा पार्क परिसरातील कामे
-पाणी अडवण्यासाठी चरी २१७ लाख ५१ हजार
-लावण्यात येणारी झाडेः २५ हजार २००
-जुना व नवीन नाला कामे
एकूण- ४५ कोटी ८८ लाख १३ हजार
...................................
ठळक चौकट
रिटेनिंग वॉल
-रंकाळा, कोटीतीर्थ तलावाला मिळणाऱ्या व अन्य नाले
-लांबी-१७ कि. मी.
-खर्च १९३ कोटी ७३ लाख ८० हजार
-एकूण ३०३ कोटी १८ लाख ६६ हजार
....................................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.