शेकाप बैटक

शेकाप बैटक
Published on

शेकाप महापालिका निवडणूक लढवणार ः कदम

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २५ ः शेतकरी कामगार पक्षातर्फे येणारी महापालिका निवडणूक लढविणार असून, उच्चशिक्षित व समतेचा विचार असणाऱ्या व्यक्तींना शेतकरी कामगार पक्ष उमेदवारी देणार आहे. यातून महापालिकेचा कारभार पारदर्शक चालावा, नागरिकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात. शहराचा विकास साधला जावा यासाठी शेतकरी कामगार पक्ष निवडणूक लढवणार आहे, अशी माहिती शहर सरचिटणिस बाबूराव कदम यांनी आज येथे दिली. शहर विभागातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते.
प्राचार्य डॉ. टी. एस. पाटील म्हणाले, ‘नगरपालिका असताना शेतकरी कामगार पक्षाची सत्ता होती. त्याकाळात शहरात आरोग्य सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, उद्यान विकास तसेच केएमटी बस सेवा अशा नागरी सुविधा सक्षमपणे देण्यात आल्या. शिवाजी विद्यापीठ स्थापनेत शेकापचा वाटा आहे. त्या सेवा आजही शहरासाठी उपयुक्त ठरत आहेत. नगरपालिकेचे महापालिकेत रूपांतर झाल्यानंतर निवडणुका धनसंपदेच्या बळावर लढवल्या जात आहेत. यातून महापालिकेत कारभार गैरव्यवहार होत आहेत. त्यामुळे शहराच्या विकासाला खिळ बसत आहे. त्यामुळे शेतकरी कामगार पक्ष शहरातील उच्चशिक्षीत व्यक्ती, विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी बजावलेल्या जाणकार व्यक्तीना शोधून महापालिकेची उमेदवारी देण्यात येईल. त्यांचा प्रचारही करण्यात येईल.’ वैशाली सूर्यवंशी, सचिन जाधव, मधुकर हरेल आदींनी मनोगत व्यक्त केले.

चौकट
लोकशाही सक्षम ठेवण्यासाठी पाऊल
निवडणुकीत वारेमाप पैसे खर्च करून निवडणुका लढवल्या जातात. यातून काही गैरप्रकार घडतात. अशातून निवडणूक आलेल्या पैकी काहीजन महापालिकेत गैरकारभार करतात, असे घडू नये यासाठी शेतकरी कामगार पक्ष धनशक्तीच्या विरोधात प्रामाणिक व उच्चशिक्षीत उमेदवार देणार आहे. लोकशाही सक्षम ठेवण्यासाठी हे पाऊल असेल, असेही कदम यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com