धर्मांतर बंदी करा;आत्महत्याग्रस्त ऋतुजा राजगेंना न्याय द्या : समस्त हिंदू समाजाची मागणी

धर्मांतर बंदी करा;आत्महत्याग्रस्त ऋतुजा राजगेंना न्याय द्या : समस्त हिंदू समाजाची मागणी

Published on

72486
किंवा
72487

धर्मांतर बंदी कायदा करा
समस्त हिंदू समाजाची दुचाकी रॅलीतून मागणी; आत्महत्याग्रस्त ऋतुजा राजगेंना न्याय द्या

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २३ : सांगली येथील सात महिन्यांच्या गर्भवती ऋतुजा सुकुमार राजगे यांना सासरच्या लोकांनी हिंदू धर्मातून ख्रिश्‍चन धर्मात धर्मांतर करावे, यासाठी त्रास दिल्याने त्यांनी आत्महत्या केली. त्यामुळे त्यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या सर्वांना कठोर शिक्षा व्हावी, सरकारने धर्मांतर बंदी कायदा लागू करावा, या मागणीसाठी आज समस्त हिंदू समाजातर्फे शहरातील प्रमुख मार्गावरून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोटारसायकल रॅली काढली. या ठिकाणी जोरदार घोषणा देत आंदोलकांनी निदर्शने केली.
राजारामपुरी येथील माऊली चौक येथून आमदार लांडगे यांच्या नेतृत्वाखाली मोटारसायकल रॅलीला सुरुवात झाली. राजाराम रोड, बागल चौक, शिवाजी उद्यमनगर, उमा टॉकीज चौक, आझाद चौक, टेंबे रोड, बिंदू चौक, दसरा चौक, व्हिनस कॉर्नरमार्गे ही रॅली जिल्हाधिकारी कार्यालय येथे आली. यामध्ये महिला आंदोलकांचा सहभाग लक्षणीय होता. प्रत्येकाच्या हातात ‘हिंदूंचे धर्मांतरण थांबवा’, ‘प्राण सोडला पण हिंदू धर्म नाही सोडला’, ‘राज्य सरकारने लवकरात लवकर धर्मांतर बंदी कायदा लागू करावा’ असे फलक होते. दरम्यान शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसीलदार स्वप्नील पवार यांना निवेदन दिले.
आंदोलनात अॅड. अनुजा धरणगावकर अॅड. शुभांगी निंबाळकर, स्मीता गंभीर, मेघा जोशी, संताजी घोरपडे, अजित ठाणेकर, आशिष लोखंडे, अनिरुद्ध कोल्हापुरे, विजयसिंह खाडे-पाटील, आप्पा लाड, दीपक देसाई, सचिन पोवार, विशाल पिसे, मनोहर सोरप, विशाल जाधव, नीलेश शिंदे, योगेश केरकर, संदीप सासने, कैलाश दीक्षित, विशाल शिराळकर, सुनील वाडकर आदी सहभागी झाले होते.
----------------
..तर जशास तसे
उत्तर ः आमदार लांडगे
यावेळी आमदार लांडगे म्हणाले, सांगलीत घडलेली घटना दुर्देवी आहे. ख्रिश्‍चन समाजाच्या धर्मगुरूंकडून आमिष दाखवून चुकीच्या पद्धतीने असे धर्मांतराचे प्रकार सुरू आहेत. यासाठी येत्या अधिवेशनात धर्मांतर बंदी कायदा लागू करावा, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देणार आहे. राज्यात असे प्रकार पुन्हा घडल्यास निषेध मोर्चे काढले जाणार नाहीत, तर धर्मांतर करणाऱ्यांना थेट जशास तसे उत्तर दिले जाईल. यासाठी सर्व हिंदूबांधवांनी एकत्र यावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com