सूरज मुंडे ठरला चांदीच्या गदेचा मानकरी

सूरज मुंडे ठरला चांदीच्या गदेचा मानकरी
Published on

36593
लिंगनूर कसबा नूल ः येथे झालेल्या कुस्ती स्पर्धेतील विजेत्या सूरज मुंडेला अमोल पाटील यांच्याहस्ते चांदीची गदा देऊन गौरविण्यात आले. यावेळी उपस्थित शंकर कुरळे, अजित वाळकी, जालिंदर मुंडे, सुनील कुरळे, शंकर घुगरे आदी..
------------------------
सूरज मुंडे ठरला चांदीच्या गदेचा मानकरी

लिंगनूर कसबा नूलला कुस्ती मैदान ः ९० मल्लांचा सहभाग

सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १० ः लिंगनूर कसबा नूल (ता. गडहिंग्लज) येथे श्री बसवेश्वर यात्रेनिमित्त हनुमान तालीम मंडळातर्फे आयोजित कुस्ती स्पर्धेत कोल्हापूरचा पैलवान सूरज मुंडेने हरियाणाच्या बोगी सिंगला चितपट केले. त्याला रोख २५ हजार रुपये व चांदीची गदा बक्षीस देण्यात आली. पूर्णवेळेत कुस्ती निकाली न निघाल्याने मुंडेने पॉईंटवर बाजी मारली.
स्पर्धेत स्थानिकांसह महाराष्ट्र, कर्नाटक व हरियाणा राज्यातील ९० कुस्तीपटूंनी भाग घेतला. विजेत्यांना तब्बल रोख दोन लाखांची बक्षिसे व चषक देऊन गौरविण्यात आले. द्वितीय क्रमांकाच्या २० हजार रुपये बक्षिसाच्या लढतीत कोल्हापूरच्या गणेश मुंडेने हरियाणाच्या हरीशकुमारला झोळी डावावर चितपट केले. १५ हजारांच्या तृतीय लढतीत कोल्हापूरच्या मोहन पाटीलने हरियाणाच्या संदीपकुमारवर पॉइंटने विजय मिळविला. याशिवाय अन्य ३० लढतींमधील विजेत्यांना रोख रक्कम व चषक देऊन गौरविण्यात आले.
विजेत्यांना जिल्हा परिषद सदस्या शैलजा पाटील, अभिनव अकॅडमीचे डॉ. अमोल पाटील, गोडसाखरचे अध्यक्ष प्रकाश पताडे, पंचायत समिती सदस्या सुनीता देसाई, सारिका बटकडली, करंबळीचे सरपंच अनुप पाटील, सुनील माळवी, सचिन देसाई, अनंत कुलकर्णी, रमाकांत येसरे यांच्याहस्ते बक्षिसे देण्यात आली. पंच म्हणून शंकर कुरळे, आकाश नलवडे, उमेश रामजी, शंकर घुगरे, रवींद्र डोंगरे, सागर शिंदे, बसवराज पाटील, श्रीरंग कुरळे, प्रज्योत खांडेकर यानी काम पाहिले. कृष्णात चौगुले यांनी सूत्रसंचलन केले. हणमंत घुले यांच्या हलगीवादनाने प्रेक्षकांची मने जिंकली.
.................
चौकट...
सख्खे भाऊ विजयी
प्रथम व द्वितीय क्रमांकाचे विजेते सूरज मुंडे व गणेश मुंडे सख्खे भाऊ आहेत. सध्या ते कोल्हापूरच्या शाहू कुस्ती केंद्रात सराव करतात. वडील वस्ताद जालिंदर मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली दोघेही सराव करतात. जालिंदर यांचे मूळ गाव बीड असून, कुस्ती प्रेमापोटी ते कोल्हापुरात स्थायिक झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com