महालक्ष्मी संस्था अध्यक्षपदी प्राची मायदेव

महालक्ष्मी संस्था अध्यक्षपदी प्राची मायदेव
Published on

37909
प्राची मायदेव, श्रद्धा निळपणकर
.............................
महालक्ष्मी वुमेन्स सोसायटी
अध्यक्षपदी प्राची मायदेव

सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १७ ः येथील श्री महालक्ष्मी वुमेन्स को-ऑप क्रेडीट सोसायटीच्या अध्यक्षपदी प्राची दत्तात्रय मायदेव यांची, तर श्रद्धा रामचंद्र निळपणकर यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहायक निबंधक अनिता शिंदे-चाळके यांनी केली. संस्थेची पंचवार्षिक निवडणूक रवळनाथ संस्था समूहाचे संस्थापक एम. एल. चौगुले यांच्या नेतृत्वाखाली बिनविरोध झाली.
संचालक मंडळात सर्वसाधारण गटातून प्राची मायदेव, श्रद्धा निळपणकर, अलका आरबोळे, संपदा चौगुले, जयश्री गुरव, ममता मजती, कल्पना पाटील, सविता पाटील, उत्कर्षा पोतदार, मीना रिंगणे, तर अनुसूचित जाती गटातून स्वाती सांगावकर, इतर मागासवर्गीय गटातून सुप्रिया चिकुर्डे, भटक्या जाती गटातून प्रियांका नाईक व पुरुष राखीव गटातून एम. एल. चौगुले व सुनील पट्टणशेट्टी यांचा समावेश आहे. संचालक मंडळाच्या पहिल्या सभेत पदाधिकारी निवडी झाल्या. मायदेव यांना मीना रिंगणे, उत्कर्षा पोतदार, तर निळपणकर यांना ममता मजती, संपदा चौगुले सूचक व अनुमोदक राहिले. दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज आल्याने शिंदे-चाळके यांनी निवड बिनविरोध घोषित केली. यावेळी रवळनाथचे अध्यक्ष डॉ. आर. एस. निळपणकर, सीईओ डी. के. मायदेव, महालक्ष्मीच्या संचालिकांसह गौरी बेळगुद्री, व्यवस्थापिका विद्या दळवी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com