इचल : संक्षिप्त

इचल : संक्षिप्त
Published on

स्पर्धा परीक्षेतील यशाबद्दल
अश्विनी लोहारचा सत्कार
इचलकरंजी ः महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे कर सहाय्यक व महसूल सहाय्यक पदासाठी घेतलेल्या स्पर्धा परीक्षेत अश्विनी लोहार हिने यश प्राप्त केले. तिचा महापालिका कामगार युनियन व के. एल. मलाबादे महापालिका सेवकांची सहकारी पतसंस्थेतर्फे अध्यक्ष ए. बी. पाटील यांच्या हस्ते सत्कार झाला. यशात महापालिकेच्या गुरुवर्य रवींद्रनाथ टागोर वाचनालयाचे सहकार्य लाभले असल्याचे तिने सांगितले. तिचे वडील महापालिकेच्या घंटागाडीवर कर्मचारी आहेत, तर इतर वेळी ते रिक्षा चालवितात. शंकर अगसर, हरी माळी, गणेश शिंदे, प्रशांत आरगे, स्मिता आवळे, धनंजय पळसुले, मिलिंद वेदपाठक, सुभाष आवळे, अमोल लाखे, राजश्री कोरगावकर आदी उपस्थित होते.


कॅन्सरग्रस्तांसाठी
केस दान केलेल्यांचा गौरव
इचलकरंजी ः येथील माहेश्वरी सभेतर्फे कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी केस दान केलेल्या दात्यांचा सन्मानपत्र देऊन विशेष गौरव करण्यात आला. डाॅ. एस. पी. मर्दा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमासाठी कॅन्सर तज्ज्ञ डाॅ. योगेश बंग यांच्यासह उपमहापौर अनिल डाळ्या उपस्थित होते. अध्यक्ष रामगोपाल मालाणी, सुनील मुदंडा, पुरुषोत्तम जाजू, मनोज चांडक, गोपाल मालू आदी उपस्थित होते. उमेशचंद राठी यांचे सहकार्य लाभले. या उपक्रमासाठी १०५ नागरिकांनी केस दान केले. यातून कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी विग तयार केला जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com