पाण्याचा योग्य वापर करणे काळाची गरज

पाण्याचा योग्य वापर करणे काळाची गरज
Published on

38777
आजरा ः येथे जलव्यवस्थापन शेतकरी संवाद मेळाव्यात मार्गदर्शन करताना टी. एस. गडकरी. यावेळी स्वाती उरूणकर, अविनाश फडतरे, प्रमोद तारळेकर आदी.
-------------------------------
पाण्याचा योग्य वापर करणे काळाची गरज

गडकरी ः आजऱ्यात जलव्यवस्थापनाबाबत शेतकरी संवाद मेळावा

सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. २१ ः ‘गेल्या काही वर्षांत पाटबंधारे प्रकल्पांची उभारणी झाली. मुबलक पाणीसाठे तयार झाले आहेत; पण त्या प्रमाणात पाण्याविषयी जनजागृती होत असल्याचे दिसत नाही. आजही पाण्याचा अपव्यय मोठ्या प्रमाणात होताना दिसतो. त्यामुळे पाण्याचा योग्य वापर व नियोजन करणे काळाची गरज आहे,’ असे प्रतिपादन जलअभ्यासक टी. एस. गडकरी यांनी केले.
येथील तहसीलदार कार्यालयालयाच्या सभागृहात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलव्यवस्थापन कृती पंधरवडाअंतर्गत जलसंपदा विभागाच्या वतीने जलव्यवस्थापनाबाबत शेतकरी संवाद मेळावा झाला. सर्फनाला बांधकाम प्रकल्पाच्या उपविभागीय अभियंता स्वाती उरुणकर मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी होत्या. गडहिंग्लज पाटबंधारे उपविभागीय अभियंता अविनाश फडतरे, सहायक गटविकास अधिकारी दिनेश शेटे, कृषी तंज्ञत्रान व्यवस्थापन (आत्माचे) तंत्र अधिकारी अमित यमगेकर, संताजी घोरपडे कारखान्याचे केन डेव्हलमेंट विभागाचे प्रमोद तारळेकर प्रमुख उपस्थित होते. उपस्थितांनी जलप्रतिज्ञा घेतली.
गडकरी म्हणाले, ‘ऋग्वेदामध्ये पाण्याचे महत्त्व सागितले आहे. पाणी हे उत्पादनाचे साधन आहे. त्याचबरोबर राष्ट्रोन्नतीचे साधन आहे. पाण्यामुळे केवळ शेतीच नव्हे तर औद्योगिक व पिण्याच्या पाण्याची गरज पूर्ण होते. शाश्वत पाणी वापर गरजेचा आहे. शेती विकासातून आर्थिक प्रगती साधता येते. गाैतम बुद्धांच्या काळात शरयू नदीच्या पाण्यावरून तंटा झाला होता. त्यानंतर अनेकदा राज्ये, देशादेशांत नदीच्या पाण्यावरून वाद सुरू आहेत. पाण्यावरून तिसरे महायुद्ध होईल असेही सांगितले जाते. भविष्यात पाण्याची गरज लक्षात घेता जलव्यवस्थापन करणे गरजेचे आहे. वैयक्तिक व ग्रामस्तरावर यासाठी सकारात्मक पावले उचलावी लागतील.’
प्रमोद तारळेकर यांनी ठिबक सिंचनचे महत्त्व विशद केले. दिनेश शेटे यांनी छोट्या-छोट्या कृतीतून शेतकरी व नागरिकांनी पाणी बचतीचे प्रयोग राबल्याचे सांगितले. फडतरे यांनी स्वागत केले. उरुणकर व यमगेकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी बापू देशपांडे, दयानंद निऊंगरे, दत्तात्रय पाटील, जितेंद्र नांदवडेकर, विकास सुतार यांच्यासह शेतकरी व पाटबंधारे शाखेचे कर्मचारी उपस्थित होते. कालवा निरीक्षक दीपक राजवंशी यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com