वीज कोसळून जखमी युवकाचा मृत्यू

वीज कोसळून जखमी युवकाचा मृत्यू
Published on

वीज कोसळून जखमी युवकाचा मृत्यू
तासगाव, ता. २५ : सावर्डे (ता. तासगाव) येथे अंगावर वीज कोसळून जखमी झालेल्या रोहित उत्तम मंडले (वय २३) या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सायंकाळी घडली.
शुक्रवारी सायंकाळी परिसरात जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस व विजांचा कडकडाट सुरू होता. त्यावेळी रोहित मंडले अंगणात असताना त्यांच्या अंगावर वीज कोसळली. यात ते गंभीर जखमी होऊन बेशुद्ध पडले. त्यांना तात्काळ तासगाव येथील हेल्थ केअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना शनिवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. रोहित हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा असल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com