एसटी बातमी

एसटी बातमी
Published on

परिवहन मंडळाच्या वेतनवाढ
फरकाची रक्कम मिळणार कधी?
कोल्हापूर, ता. ७ ः एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना वेतनवाढ फरकाची रक्कम देण्यासाठी राज्य सरकारकडून निधी देण्यात येईल अशी घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. त्याला पाच माहिने झाले तरीही प्रत्यक्ष शासनाकडून निधीच न आल्यानेही घोषणा हवेत विरली आहे.
एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना फरकाची रक्कम देण्यासाठी राज्य सरकारकडून टाळटाळ होत असल्‍या बद्दल महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत पत्रकातील माहिती अशी की, एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना पूर्ण वेतन देण्यासाठी दर महिन्याला ४७४ कोटी ८४ रुपये इतकी रक्कम लागते. त्यात वेतनवाढ फरकाच्या हप्त्याची ५८ कोटी ३० लाख रुपये रक्कम वाढवली तर वेतनाला सरासरी ५३४ कोटी रुपये रक्कम लागणार आहे. राज्य सरकारकडून या महिन्यात ४१६ कोटी ६६ लाख रुपये रुपये रक्कम देण्यात आली. चालू महिन्यात वेतनवाढ फरकाची रक्कम देण्यासाठी एसटीला निधी मिळालेला नसून त्यामुळे या महिन्यातही एसटीला तिजोरीतूनच वेतनवाढ फरकाची रक्कम द्यावी लागेल. डिसेंबर २५ पासून २९१ कोटी ५० लाख रुपये इतका पाच महिन्यांचा थकीत निधी दर महिन्याला मागणी करूनही राज्य सरकारकडून देण्यात आलेला नाही. निधी देण्यासाठी अजूनही टोलवाटोलवी सुरू आहे. सरकारची ही घोषणा म्हणजे बोलाची कढी बोलाचा भात या म्हणीसारखी असल्याचे मत बरगे यांनी व्यक्त केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com