गडहिंग्लजचे पथदिवे सौरऊर्जेवर येणार

गडहिंग्लजचे पथदिवे सौरऊर्जेवर येणार
Published on

गडहिंग्लजचे पथदिवे सौरऊर्जेवर येणार

नगरपरिषदेचे नियोजन ः शहर पाणी योजनेच्या उपसा यंत्रणेलाही सोलर

सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ८ ः वीज बिलामध्ये बचत करण्याच्या धोरणानुसार शहरातील पथदिवे आणि नळ पाणी योजनेची उपसा यंत्रणा सौर ऊर्जेवर आणण्याचे नियोजन नगरपरिषद करीत आहे. त्यासाठी त्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याच्या दृष्टीने निविदा प्रसिद्ध केली आहे. यासाठी अंदाजे दोन कोटींचा खर्च अपेक्षित आहे.
येथील नगरपरिषद ‘क’ वर्गात आहे. शहराचा विस्तार लक्षात घेता पथदिव्यांच्या वीज बिलांवर मोठा खर्च होत आहे. राज्यातील सर्वच नगरपरिषदांच्या कार्यक्षेत्रातील पथदिवे सौरऊर्जेवर चालविण्यासाठी शासनानेच अध्यादेश काढून पालिकांना प्रोत्साहित केले आहे. त्यासाठी येथील पालिकेनेही त्याबाबत हालचाली सुरू केल्या आहेत. नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत हा विषय सभेसमोर होता. त्याला मंजुरी देऊन डीपीआरसाठी निविदा काढण्याचे ठरले. त्याची कार्यवाही आता सुरू झाली आहे.

चौकट...
* दृष्टिक्षेपात पथदिवे व वीज बिल
- एकूण पथदिवे ः २८००
- महामार्गावरील पथदिवे ः १००
- वार्षिक वीज बिल ः साधारण २ कोटी

* कशी असेल कार्यवाही
सविस्तर प्रकल्प अहवालासाठी निविदेद्वारे तज्ज्ञ संस्थेची नेमणूक होईल. त्यांनी दिलेल्या मुदतीत हा अहवाल तयार करायचा आहे. तो अहवाल पालिकेने स्वीकारून त्याच्या तांत्रिक मंजुरीसाठी महाऊर्जा (मेढा) कडे जाईल. तेथील मंजुरीनंतर हा प्रस्ताव निधी मागणीसाठी शासनाच्या नगरविकास विभागाकडे पाठविला जाईल. तांत्रिक मंजुरी मिळालेल्या रकमेत ‘क’ वर्ग पालिकेसाठी ९५ टक्के हिस्सा राज्य शासनाचा, तर पाच टक्के हिस्सा नगरपरिषदेचा असेल.

* अंदाजे दोन कोटींचा निधी
शहरातील सर्व पथदिवे आणि पाणी योजनेची उपसा यंत्रणा सौरऊर्जेवर आणण्याचे ठरविले आहे. या दोन्हींच्या वीज बिलापोटी वर्षाला साधारण दोन कोटींचा खर्च होतो. यासाठी सौरऊर्जा प्रकल्प राबविल्यास या वीज बिलाची बचत होणार आहे. सौर प्रकल्पासाठी अंदाजे दोन कोटींचा निधी लागणार असला तरी डीपीआरनंतर नेमक्या निधीचा आकडा कळणार आहे.

* पाणी योजनेचेच बिल कोटीवर
दरम्यान, पथदिव्यांचे व पाणी योजनेच्या उपसा सयंत्राच्या वीज बिलापोटी एकत्रित वर्षाला दोन कोटी खर्च होतो. यामध्ये एक ते सव्वा कोटीचे वीज बिल फक्त पाणी योजनेचेच असते. साधारण ६० ते ७० लाख रुपये पथदिव्यांच्या बिलापोटी खर्च होतात. त्यामुळेच हे दोन्ही घटक सौरऊर्जेवर आणल्यास पालिकेची दोन कोटी रुपयांची बचत होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com