

45614
भडगाव : डॉ. ए. डी. शिंदे अभियांत्रिकीच्या कॅम्पसमधील निवड झालेल्या विद्यार्थ्यांसमवेत डॉ. डी. व्ही. घेवडे, प्रा. अभिजित बोरगावे, प्रा. शरद लाटकर आदी उपस्थित होते.
‘डॉ. शिंदे अभियांत्रिकी’च्या
१६ विद्यार्थ्यांची कंपनीत निवड
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २१ : भडगाव (ता. गडहिंग्लज) येथील डॉ. ए. डी. शिंदे अभियांत्रिकी महाविद्यालयातील इलेक्ट्रिकल अँड कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विभागाच्या १६ विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांमध्ये निवड झाली. याद्वारे प्लेसमेंट क्षेत्रात या विभागाने चांगले यश मिळविले आहे. या यशामुळे महाविद्यालयाच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाची व उद्योगाभिमुख प्रशिक्षणाची पुन्हा एकदा प्रचिती आल्याची माहिती संस्थेच्या सचिव स्वाती कोरी यांनी सांगितले.
त्या म्हणाल्या, ‘विद्यार्थ्यांच्या तांत्रिक ज्ञानासोबतच संवाद कौशल्य, व्यक्तिमत्त्व विकास, मुलाखत तयारी, गटचर्चा आणि उद्योग क्षेत्राशी संबंधित प्रशिक्षण यांवर विशेष भर दिला आहे. या सर्व प्रयत्नांचे फलित म्हणून विद्यार्थ्यांनी प्रतिष्ठित कंपन्यांमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. या प्लेसमेंट मोहिमेत जबील या कंपनीमध्ये तुषार काशीद, आर्य कांबळे, आदित्य भिसे, सागर प्रधान, कौशल मगदूम आणि विनय काटवरे या विद्यार्थ्यांची निवड झाली. तसेच आदीसॉफ्ट टेक्नॉलॉजीमध्ये श्रीरंग अरडळकर याची तर टाटा गोशनमध्ये किर्ती तांगडी, बिकर्टमध्ये प्रमोद मास्कर, याझाकीमध्ये महादेव जाधव आणि जेसीबीमध्ये श्रेयश शेळके, बॉशमध्ये साधना भांडिगारे व आकाश अकनुरकर, ह्युंडाईमध्ये रविंद्र बन्ने यांची निवड झाली. विशेष म्हणजे ओमकार कांदार यांची भारत फोर्जमध्ये निवड झाली आहे. प्राचार्य डॉ. डी. व्ही. घेवडे यांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबरच रोजगारक्षम कौशल्यांच्या विकासावर महाविद्यालय विशेष भर देत असल्याचे सांगितले. या यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती उर्मिला शिंदे, सचिव स्वाती कोरी, सल्लागार महेश कोरी, कॅम्पस डायरेक्टर डॉ. दिनकर घेवडे, विभागप्रमुख प्रा. अभिजित बोरगावे, प्रा. शरद लाटकर यांचे सहकार्य मिळाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.