राजाराम कारखान्याचे यंदा सहा लाख टन गाळपाचे उद्दीष्ट

राजाराम कारखान्याचे यंदा सहा लाख टन गाळपाचे उद्दीष्ट
Published on

46427
कसबा बावडा : येथील छत्रपती राजाराम कारखान्यात या वर्षीच्या गळीत हंगामासाठी मिल रोलर पूजनप्रसंगी महादेवराव महाडिक, अमल महाडिक यांच्यासह संचालक व अधिकारी, कर्मचारी.

राजाराम कारखान्याचे यंदा
सहा लाख टन गाळपाचे उद्दिष्ट
अमल महाडिक : मिल रोलर पूजन उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २५ : यंदाच्या हंगामात कसबा बावडा येथील छत्रपती राजाराम साखर कारखान्याने सहा लाख टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवले असून ते पूर्ण करण्यासाठी कारखान्याच्या सभासदांनी आपला नोंद केलेला ऊस कारखान्याला पाठवावा, असे आवाहन कारखान्याचे अध्यक्ष आमदार अमल महाडिक यांनी केले.
कारखान्यात मिल रोलरचे पूजन कारखान्याचे मार्गदर्शक संचालक माजी आमदार महादेवराव महाडिक व अमल महाडिक यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
महाडिक म्हणाले, ‘कारखान्याच्या शेती विभागातर्फे ९५०० हेक्टर क्षेत्रातील ऊस नोंदी केल्या आहेत. या वर्षीपासून कारखान्याच्या गाळप क्षमतेत वाढ झाली असून कारखान्यात सहवीज प्रकल्प व मशिनरीचे आधुनिकीकरण करून त्याची चाचणीही घेण्यात आली आहे. कारखाना गाळपासाठी सज्ज असून उत्पादन वाढीसह साखर उताऱ्यात वाढीसाठी प्रयत्न करत आहोत.’
यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष गोविंद चौगले, संचालक व जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तानाजी पाटील, माजी अध्यक्ष दिलीप पाटील, संचालक बाजीराव चौगले, धीरज उलपे, नेमगोंडा पाटील, डॉ. एम. बी. किडगावकर यांच्यासह कार्यकारी संचालक प्रकाश चिटणीस व कर्मचारी, अधिकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Khadakwasla dam rainfall and water level update
solapur dcc bank
Gokul Politics Comes Full Circle: Familiar Leaders, Changed Opposition
TET students
Marathi News Esakal
www.esakal.com