

65152
गडहिंग्लज : तालुकास्तरीय शासकीय कबड्डी स्पर्धेतील १४ वर्षांखालील गटातील विजेता महात्मा फुले हायस्कूलचा मुलींचा संघ.
...............
मुलांत शिंदे, जागृती, कित्तूरकरला विजेतेपद
तालुकास्तरीय शासकीय कबड्डी स्पर्धा : मुलींमध्ये महागाव, नंदनवाड, मानेची बाजी
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २० : तालुकास्तरीय शासकीय शालेय कबड्डी स्पर्धेत मुलांच्या गटात सौ. वि. दि. शिंदे हायस्कूल, जागृती हायस्कूल, रावसाहेब कित्तूरकर कनिष्ठ महाविद्यालयाने विजेतेपद पटकावले, तर मुलींच्या गटात महागाव, नंदनवाडसह संभाजीराव माने कनिष्ठ महाविद्यालयाने बाजी मारली. जिल्हा क्रीडा परिषद कोल्हापूर, जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय व गडहिंग्लज तालुका क्रीडाशिक्षक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा झाली.
चौदा, सतरा व एकोणीस वर्षांखालील गटात कबड्डी स्पर्धा झाली. चौदा वर्षांखालील गटात मुलांच्या २६, तर मुलींच्या १५ संघांनी, सतरा वर्षांखालील गटात मुलांचे व मुलींचे ५१ तर १९ वर्षांखालील गटात मुलांचे व मुलींचे ११ संघ सहभागी झाले होते. एकूण १२३६ खेळाडूंनी सहभाग घेतला होता. शिवराज महाविद्यालयाच्या मैदानावर ही स्पर्धा झाली. दरम्यान, स्पर्धाप्रमुख विकास दावणे यांनी स्वागत केले. संदेश कोकितकर यांनी प्रास्ताविक केले. निवृत्त क्रीडा शिक्षक विजय आबिटकर व तानाजी पाटील यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. मुख्याध्यापक वैजनाथ पालेकर, बाबूराव गाडीवड्डर उपस्थित होते.
गटनिहाय अनुक्रमे विजेते असे ः १४ वर्षांखालील मुले ः सौ. वि. दि. शिंदे हायस्कूल, कलमेश्वर विद्यालय सांबरे. मुली ः महात्मा फुले हायस्कूल महागाव, श्री शिवराय हायस्कूल नंदनवाड. १७ वर्षांखालील मुले ः जागृती हायस्कूल गडहिंग्लज, जय भारत स्कूल महागाव. मुली ः श्री शिवराय नंदनवाड, महात्मा गांधी हायस्कूल नरेवाडी. १९ वर्षांखालील मुले ः रावसाहेब कित्तूरकर कनिष्ठ महाविद्यालय, संभाजीराव माने कनिष्ठ महाविद्यालय. मुली ः संभाजीराव माने कनिष्ठ महाविद्यालय, रावसाहेब कित्तूरकर कनिष्ठ महाविद्यालय.
विजेत्या संघांची भोगावती महाविद्यालय कुरुकली (ता. करवीर) येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली. विनायक नाईक, संपत सावंत, जयवंत पाटील, मदन दंडगीदास, विनायक शिंदे, विकास दावणे, संदेश कोकितकर, रमेश चौगुले, विकास पाटील, राहुल रेडेकर, दयानंद ग्वाडी, सुभाष तिप्पे, देवदत्त पाटील, देवदत्त कांबळे, राजेंद्र शेलार, बिरजे सर, संजय माने यांनी पंच म्हणून काम पाहिले.
...............
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.