कुदनूरमधील सुतार कुटुंबियांच्या मदतीसाठी विश्‍वकर्मा संस्थचे निवेदन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कुदनूरमधील सुतार कुटुंबियांच्या
मदतीसाठी विश्‍वकर्मा संस्थचे निवेदन
कुदनूरमधील सुतार कुटुंबियांच्या मदतीसाठी विश्‍वकर्मा संस्थचे निवेदन

कुदनूरमधील सुतार कुटुंबियांच्या मदतीसाठी विश्‍वकर्मा संस्थचे निवेदन

sakal_logo
By

00856
कोवाड : कोल्हापूर जिल्हा श्री विश्वकर्मा सुतार - लोहार सेवा संस्थेतर्फे नियोजन समितीचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांना निवेदन देताना संस्थेचे कार्यकर्ते.


कुदनूरमधील सुतार कुटुंबियांच्या
मदतीसाठी विश्‍वकर्मा संस्थचे निवेदन
कोवाड : कुदनूर (ता. चंदगड) येथे आगीच्या दुर्घटनेत व्यवसायाचे कोट्यावधीचे नुकसान झालेल्या शशिकांत सुतार, गजानन सुतार व दिलीप सुतार यांना आर्थिक मदत व्हावी, अशी मागणी कोल्हापूर जिल्हा श्री विश्‍वकर्मा सुतार-लोहार सेवा संस्थेतर्फे नियोजन समितीचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांचेकडे केली आहे. संस्थेतर्फे जिल्हा अध्यक्ष कृष्णा लोहार यांच्या नेतृत्वाखाली क्षीरसागर यांना निवेदन दुले. या वेळी राजेश क्षीरसागर यांनी शासनस्तरावर पाठपुरावा करुन सहकार्य करण्याचे सांगितले. निवेदनात म्हटले आहे, ३१ डिसेंबर रोजी रात्री सुतार बंधूच्या ऑईल मिल, सॉ मिल, राईस मिल व फेब्रीकेटरला दुकानाला आग लागली. सर्व व्यवसाय एकमेकाला लागून असल्याने आगीत भस्मसात झाले. सुतार कुटूंबियांवर कोसळलेले हे संकट मोठे असल्याने त्यांना आर्थिक मदतीची गरज आहे. शासनस्तरावरून मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करावा. या वेळी अशोकराव सुतार (यरनाळकर), शशिकांत सुतार, दिलीप सुतार, गजानन सुतार, अनिल कांबळे (कुदनूर) उपस्थित होते.