
गंगामाई फौंडेशनतर्फे बक्षीस वितरण
00963
कोवाड ः केंद्रीय प्राथमिक शाळेत बक्षिस वितरण समारंभात युवराज पाटील यांनी मार्गदर्शन केले. दयानंद सलाम, चंद्रकांत कुंभार, मायाप्पा पाटील, विजय सोनार, सुनिल कुंभार आदी उपस्थित होते.
-----------
गंगामाई फौंडेशनतर्फे बक्षीस वितरण
सकाळ वृत्तसेवा
कोवाड, ता. २४ ः येथील केंद्रीय प्राथमिक शाळेत गंगामाई फौंडेशनतर्फे आयोजित केलेल्या निबंध, चित्रकला व वक्तृत्व स्पर्धांतून यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण केले. अध्यक्षस्थानी रामा यादव होते.
विद्यार्थ्यांच्या कलागुणाना वाव मिळावा. त्यांच्या मनातून परीक्षेची भिती दूर व्हावी व त्यांच्यात नेतृत्वाचे गुण निर्माण व्हावेत, यासाठी स्पर्धांचे आयोजन केल्याचे सांगून गंगामाई फौंडेशनचे संचालक चंद्रकांत कुंभार यांनी विद्यार्थ्यांसाठी जे जे करता येईल ते करणार असल्याचे सांगितले. व्यापारी संघटनेचे अध्यक्ष दयानंद सलाम यांनी शाळेच्या भौतीक प्रगतीत वाढ करण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे सांगितले.
मायाप्पा पाटील यांनी गंगामाई फौंडेशनचे कार्य सामाजिक असल्याने अशा संस्थांनी पुढे येण्याची गरज असल्याचे सांगितले. विविध स्पर्धांतून यश प्राप्त केलेल्या ५४ विद्यार्थ्यांना युवराज पाटील, दयानंद सलाम, मायाप्पा पाटील, विजय सोनार, सुनिल कुंभार यांच्याहस्ते बक्षिस वितरण केले. केंद्रप्रमुख सुधीर मुतकेकर, विनायक कुंभार, विष्णू जोशी, संजिवनी भोगण, राजेंद्र पाटील उपस्थित होते. मुख्याध्यापक श्रीकांत पाटील यांनी प्रास्ताविक केले. भावना आतवाडकर यांनी स्वागत केले. कविता पाटील यांनी सुत्रसंचालन केले. सुवर्णा कुंभार यांनी आभार मानले.