Sat, April 1, 2023

कोवाड-ओलमची ऊस बिलं शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर जमा
कोवाड-ओलमची ऊस बिलं शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर जमा
Published on : 2 March 2023, 2:50 am
‘ओलम’ची बिले जमा
कोवाड, ता. २ ः राजगोळी खुर्द (ता. चंदगड) येथील ओलम (हेमरस) साखर कारखान्याकडून चालू गळीत हंगामातील १ ते १५ फेब्रुवारीपर्यंत गाळपासाठी आलेल्या ऊसाची बिलं शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर जमा केल्याची माहिती कारखान्याचे बिझनेस हडे भरत कुंडल यांनी दिली.
कारखान्याकडे गाळप झालेल्या ऊसाची बिलं प्रतिटन ३ हजार आठ रुपये प्रमाणे शेतकऱ्यांना एकरकमी दिली आहेत. १५ फेब्रुवारीनंतर गाळप झालेल्या ऊसाची बिलं गळीत हंगामाच्या अखेरीला देण्याचे नियोजन केले आहे. वाहतूक व तोडणी मजूरांची बिलेही टप्प्याटप्याने दिली जात आहेत. दरवर्षी शेतकरी, तोडणी व वाहतूकदारांची बिले वेळेवर दिली जातात. त्याअनुषंगाने यावर्षीही कारखाना प्रशासनाने बिलांचे नियोजन केल्याची माहिती कुंडल यांनी दिली.