Thur, March 30, 2023

कोवाड - तरस
कोवाड - तरस
Published on : 16 March 2023, 5:04 am
बुक्किहाळ परिसरात तरसाचे दर्शन
कोवाड ः बुक्किहाळ (ता. चंदगड) परिसरात तरसाचे दर्शन होत असल्याने शेतकऱ्यांच्यात भीती निर्माण झाली आहे. रात्री ऊसाला पाणी देण्यासाठी शेतकरी शेतातून काम करत आहेत. वनविभागाने याची माहिती घेऊन तरसाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. आठ दिवसांपूर्वी बुक्किहाळ बुद्रूक येथील राजू बच्चेनहट्टी व नागेंद्र ढेकोळकर यांना रात्री ९ वाजता तरस दिसला. जवळ असलेल्या महिपाळगडाच्या जंगलातून हे प्राणी येत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. होसूर, कौलगे,कल्याणपूर भागात तरस सतत फिरत असल्याचे शेतकरी सांगतात. वनविभागाने याची माहिती घेऊन याचा बंदोबस्त करावा,अशी मागणी होत आहे.