Thur, March 23, 2023

कोवाड - हल्ला
कोवाड - हल्ला
Published on : 16 March 2023, 7:25 am
नागरदळे येथे एकावर खुनी हल्ला
कोवाड ः नागरदळे (ता. चंदगड) येथे अज्ञात व्यक्तींनी खुनी हल्ला केल्याने एकजण गंभीर जखमी झाला. चंद्रकांत रामू हदगल (वय ४५) असे जखमीचे नाव आहे. जखमीवर बेळगाव येथील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. हल्लेखोरांनी धारदार हत्याराने सपासप वार करुन पोबारा केल्याने खळबळ उडाली आहे. चंदगड पोलिस निरीक्षक संतोष घोळवे यांनी पंचनामा करुन तपास यंत्रणा गतिमान केली आहे.
चंद्रकांत हदगल यांचे ‘वारी’ नावाच्या शेतात घर आहे. सकाळी ते नेहमीप्रमाणे घरातून बाहेर पडले व दुचाकीवरुन गावात येत असताना दबा धरुन बसलेल्या अज्ञातांनी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला.