
कोवाड - प्रकाशन
01040
सीमावाद आणि मराठी भाषिक
पुस्तकाचे प्रकाशन
कोवाड ः येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाचे समाजशास्त्र विभागप्रमुख डॉ. व्ही. के. दळवी यांच्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद आणि मराठी भाषिक पुस्तकाचे प्रकाशन शिवाजी विद्यापीठाचे प्र. कुलगुरु डॉ. पी. एस. पाटील यांच्या हस्ते झाले. डॉ. आर. डी. कांबळे यांनी स्वागत केले. महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील मराठी भाषिकांच्या वेदना, त्यांच्या भावना आणि घुसमट यावर प्रकाश टाकणारे हे पुस्तक वाचकांना नक्कीच भावेल, अशी भावना डॉ. पाटील यांनी व्यक्त केली. प्रा. एन. पाटील यांनी सीमाप्रश्नाच्या वेदना ज्वलंत ठेवणारे पुस्तक असल्याचे सांगितले. यावेळी सर्वोदय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. ए. एस. जांभळे, माजी राज्यमंत्री भरमू पाटील, प्रा. एन. एस. पाटील, एम. व्ही. पाटील, गोविंद पाटील, प्रा. दीपक पाटील, डॉ. आर. डी. कांबळे, प्रा. आर. टी. पाटील उपस्थित होते. डॉ. व्ही. के. दळवी यांनी आभार मानले.