निट्टूरच्या मैदानात उमेश चव्हाण विजेता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निट्टूरच्या मैदानात उमेश चव्हाण विजेता
निट्टूरच्या मैदानात उमेश चव्हाण विजेता

निट्टूरच्या मैदानात उमेश चव्हाण विजेता

sakal_logo
By

01046
कोवाड ः निट्टूर मैदानातील कुस्तीचा क्षण.
-----------
निट्टूरच्या मैदानात उमेश चव्हाण विजेता
कोल्हापूरच्या मल्लांचे वर्चस्व; ६० हून अधिक कुस्त्या
कोवाड, ता. २३ ः निट्टूर (ता. चंदगड) येथील कुस्ती मैदानात कोल्हापूरच्या शाहू आखाड्याचा मल्ल उमेश चव्हाण याने घुटना डावावर पंजाब केसरी विजेता मल्ल रिंकू खन्नाला अस्मान दाखवून प्रथम क्रमांकाची कुस्ती जिंकली.
दुसऱ्य क्रमांकाच्या लढतीत कोल्हापूरच्या भैया पवारने कर्नाटक केसरी विजेता मल्ल गुत्ताप्पा काटेला चितपट केले. चंदगडच्या किर्तीकुमार बेनकेने हरियाणा केसरी विजेता मल्ल राकेशकुमारला अस्मान दाखवत तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती जिंकली. हणमंत घुले यांच्या हालगीच्या निनादात मैदानात चितथरारक ६० कुस्त्या झाल्या. कोल्हापूरच्या मल्लांनी मैदान गाजवले.
निट्टूर ग्रामस्थ व तालीम मंडळातर्फे नरसिंह देवालय शेजारील मैदानात कुस्ती आखाडा आयोजित केला होता. कोल्हापूर, सांगली, बेळगांव व सीमा भागातील मल्लांनी आखाड्यात हजेरी लावली होती. नागोजी पाटील व सतबा पाटील यांच्याहस्ते आखाडा पुजन झल्यानंतर सायंकाळी पाच वाजता कुस्तीला सुरवात झाली. प्रथम क्रमांकाच्या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. उमेश चव्हाणने अवघ्या दोन मिनिटात रिंकू खन्नाला अस्मान दाखवत कुस्ती जिंकल्याने आखाड्यात कुस्ती शौकीकानी जल्लोष केला. भैया पवार व गुत्ताप्पा काटे यांच्यात मोठी चुरस झाली. किर्तीकुमार बेनकेने मात्र सुरवातीपासून राकेशकुमारवर ताबा मिळवला होता. आठव्या मिनिटात किर्तीकुमारने अत्यंत चपळाईने राकेशकुमारवर विजय मिळवला. याशिवाय मैदानात पिंपळ घुल्ले, गणेश मलतवाडी, कार्तिक जाधव, साहिल नेसरकर, मुबारक मुल्ला, निखील पाटील (निट्टूर), गौस दुर्गा, करण खादरवाडी, यल्लाप्पा तुर्केवाडी, वैजनाथ कार्वे, विशाल डवळे यांच्यासह मल्लांनी मैदान गाजवले. मैदानात माजी राज्यमंत्री भरमूआण्णा पाटील, एम.जे. पाटील, युवराज पाटील, सरपंच गुलाब पाटील, दयानंद सलाम, सचिन पाटील, यल्लापा पाटील उपस्थित होते. मारुती पाटील, गावडू पाटील, भैरु पाटील, मारुती पाटील, नागोजी साळूंखे, कल्लापा पाटील, भरमू पाटील, लक्ष्मण पाटील, शिवाजी मांडेकर, शिवाजी माडूळकर, देवजी पाटील यांनी पंच म्हणून काम पाहिले. कृष्णा चौगले (राशिवडेकर), वाय. व्ही. कांबळे, युवराज पाटील यांनी समालोचन केले.