पाझर तलाव मुख्य भिंतीवर झाडे, झुडपांचा विळखा

पाझर तलाव मुख्य भिंतीवर झाडे, झुडपांचा विळखा

01331
कोवाड : निट्टूर क्रमांक दोनच्या पाझर तलावाच्या भिंतीवर अशी झाडं वाढली आहेत.

निट्टूर तलावाच्या भिंतीवर
झाडे, झुडपांचा विळखा
सुरक्षिततेचा प्रश्‍न; रस्त्यावरही पाण्याची डबकी
अशोक पाटील : सकाळ वृत्तसेवा
कोवाड, ता. ३१ : निट्टूर (ता. चंदगड) येथील पाझर तलाव क्रमांक दोनच्या मुख्य भिंतीवर दोन्ही बाजूंनी झाडे, झुडपांचा विळखा पडला आहे. भिंतीच्या रस्त्यावर खड्डे पडून पाण्याची डबकी तयार झाली आहेत. त्यामुळे तलावाच्या भिंतीला धोका निर्माण होऊ शकतो. तलावाच्या भिंतीची सुरक्षितता महत्त्वाची असल्याने भिंतीवर वाढलेली झाडे, झुडपे तातडीने हटविण्याची मागणी होत आहे.
निट्टूर पाझर तलाव क्रमांक दोनच्या विस्तीर्ण भिंतीवर दोन्ही बाजूंनी झाडे, झुडपे वाढली आहेत. झाडांची मुळे भिंतीत उतरत असल्याने भिंतीवरील दगड उचलले जात आहेत. त्यामुळे तलावाच्या भिंतीला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. तलावाची क्षमता १५४.६१ दशलक्ष घनफूट इतकी आहे. यावर्षी तलावाच्या पाण्याची पातळी कमी झाल्याने सध्या ३२ टक्के साठा आहे. तलावाच्या पाण्यामुळे खडकाळ जमिनीत शेतकऱ्यांनी पिके घेतली आहेत. शेकडो एकर जमीन ओलिताखाली आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागाने तलावाच्या देखभाल दुरुस्तीकडे लक्ष देण्याची गरज आहे. तलावाच्या भिंतीच्या दोन्ही बाजूंनी दगडी चिपींग केले आहे. त्यातून मोठी झाडे वाढली आहेत. दोन वर्षांपासून तलावाची अशीच स्थिती आहे. तलावाची आजतागायत डागडुजी व दुरुस्ती झालेली दिसत नाही. तलावाच्या भिंतीवर मोठे खड्डे पडले आहेत. पावसाच्या पाण्याने खड्ड्यांतून पाणी साचल्याने पाण्याची डबकी तयार झाली आहेत. भिंतीच्या रस्त्यावरील पाणी बाहेर जाण्याची गरज असताना ते पाणी खड्ड्यांतून साचत असल्याने धोका आहे. सांडव्यावर लोखंडी ब्रीज बांधले आहे. त्याला एकदाही रंग लावलेला नाही. त्यावर गंज येऊन त्याची झीज होत आहे. त्यामुळे तलावाच्या देखभाल दुरुस्तीचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.
-----------------------
कोट
तालुक्यातील काही पाझर तलावांच्या भिंतीवर झाडे, झुडपे वाढली आहेत. ती तोडण्याची गरज आहे. त्यासाठी वरिष्ठ विभागाला प्रस्ताव पाठविला आहे. त्याला मंजुरी मिळताच तलावांच्या भिंतीवरील झाडे काढली जातील.
- डी. आर. धोंडफोडे, शाखा अभियंता, पाटबंधारे विभाग-चंदगड.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com