कोवाड - हत्ती

कोवाड - हत्ती

तेऊरवाडीजवळ
हत्तीचा वावर
कोवाड, ता. ४ ः तेऊरवाडीजवळील माणीकाचे शेत नावाच्या शेतात बुधवारी रात्री हत्ती आला होता. जोंधळ्याची राखन करण्यासाठी रात्री शेतात गेलेले शेतकरी हत्तीला पाहून भयभीत झाले. वन विभागाने रात्री जंगल परिसरात गस्त सुरु करावी,अशी मागणी शेतकऱ्यानी केली. दोन दिवसापूर्वी हडलगेतील शिवाजी दुंडगेकर यांची पाण्याची विद्युतमोटर हत्तीने नदीत फेकली. बी. एम. पाटील यांच्या पाईप लाईनच्या पाण्याच्या कॉकची मोडतोड केली आहे. बुधवारी रात्री माणीकाच्या शेतात भरमू गडकरी यांनी हत्तीला पाहून शेतकऱ्याना सावध केले. तत्काळ ते गावी येऊन दहा-बाराजणांना घेऊन शेताकडे गेले. सर्वानी हत्तीला जंगलात हुसकावून लावले. हत्तीने तेऊरवाडी व हडलगे परिसरातील पिकांचे मोठे नुकसान केले आहे. वनविभागाने हलगर्जीपणा न करता हत्तीवर नियंत्रण ठेवून त्याला सुरक्षित ठिकाणी हालवावे, अशी मागणी तेऊरवाडीतील शेतकरी राजू भिंगुडे यांनी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com