ह्युंदाई चे वर्कशॉप १२ तास सेवेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ह्युंदाई चे वर्कशॉप १२ तास सेवेत
ह्युंदाई चे वर्कशॉप १२ तास सेवेत

ह्युंदाई चे वर्कशॉप १२ तास सेवेत

sakal_logo
By

माई ह्युंदाईचे वर्कशॉप १२ तास सेवेत

कोल्हापूर : माई ह्युंदाईचे वर्कशॉप १२ तास सुरू ठेवण्याचा ग्राहकाभिमुख निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार मुख्य वर्कशॉप सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेमध्ये खुले असणार आहे. कोल्हापूर शहर व जिल्ह्यात माई ह्युंदाईचे वाढते ग्राहक आणि त्यांच्या सोयीच्या वेळा लक्षात घेता १२ तास वर्कशॉप सुरू ठेवणे गरजेचे होते. सध्या प्रायोगिक तत्त्‍वावर मुख्य कार्यालयातील वर्कशॉप सुरुवातीला १२ तास सुरू ठेवण्यात येईल आणि टप्प्याटप्प्याने कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वर्कशॉप्स पण या पद्धतीने बारा तास सुरू ठेवण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे माई ह्युंदाईचे मॅनेजिंग डायरेक्टर तेज घाटगे यांनी सांगितले. तसेच माई ह्युंदाईच्या रौप्यमहोत्सवी वर्षात जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचून ह्युंदाईच्या सेवा देणार असल्याचेही ते म्हणाले.