Thur, Feb 9, 2023

धनगर समाज सत्कार
धनगर समाज सत्कार
Published on : 5 January 2023, 3:54 am
धनगर समाजातील सरपंच सत्कार
कोल्हापूर : धनगर समाजातील नवनिर्वाचित सरपंच व सदस्य यांचा रविवारी (ता. ८) सत्कार होत आहे. राजर्षी छत्रपती शाहू स्मारक भवनमध्ये सकाळी अकरा वाजता त्यास सुरुवात होईल. महाराष्ट्र राज्य धनगर समाज महासंघ प्रणित मल्हार सेना, युवक संघटना व अहिल्या महिला महासंघातर्फे त्याचे आयोजन केले आहे. माजी मंत्री आण्णासाहेब डांगे यांच्या हस्ते सत्कार होणार असून, गडहिंग्लजचे प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील, अशी माहिती मल्हारसेनेचे सरसेनापती बबनराव रानगे यांनी दिली.