यिन निवडणूक
यिन अध्यक्ष, उपाध्यक्षपदासाठी चुरशीने मतदान
आठ महाविद्यालयांत पहिल्या टप्प्यातील निवडणूक; आता निकालाची उत्सुकता
कोल्हापूर, ता. ९ : सकाळ माध्यम समूहाच्या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्कच्या (यिन) अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी आठ महाविद्यालयांत आज चुरशीने मतदान झाले.
उमेदवारांनी केलेला ईर्ष्येने प्रचार, मतदारांचा उत्साह व मतदान केंद्रांवर झालेल्या गर्दीने निकालाची उत्सुकता ताणली आहे. पहिल्या टप्प्यातील ही निवडणूक असून, दुसरा टप्प्यातील निवडणूक १२ जानेवारीला होत आहे.
राजर्षी छत्रपती शाहू महाविद्यालय (कदमवाडी), कमला महाविद्यालय, तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियरिंग ॲंड टेक्नॉलॉजी (वारणानगर), डॉ. डी. वाय. पाटील कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय (तळसंदे), सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय (मुरगूड), कॉन्टिनेंटल इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट ऑफ कॅटरिंग टेक्नॉलॉजी( कोल्हापूर), डी. वाय. पाटील स्कूल ऑफ हॉस्पिटॅलिटी (कोल्हापूर), भारती विद्यापीठाचे न्यू लॉ कॉलेजमध्ये (कोल्हापूर) निवडणुका झाल्या.
कोट
11493
सकाळ माध्यम समूह नेहमीच समाज उपयोगी उपक्रम राबवत असते. यिनच्या माध्यमातून महाविद्यालयीन जीवनापासूनच विद्यार्थ्यांमध्ये संघटन कौशल्य, नेतृत्व व संभाषण कौशल्य या व इतर गुणांचा विकास करण्यासाठी एक व्यासपीठ तयार करून देते. तसेच विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव मिळण्यासाठी मदत करते. आज सकाळच्या माध्यमातून यिन निवडणूक झाली. त्यासाठी आमच्या महाविद्यालयातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यिनची पुढील वाटचाल चांगली
- डॉ. एस. व्ही. आणेकर, प्राचार्य, टीकेआयईटी, वारणानगर
कोट
11487
सकाळ यिनतर्फे महाविद्यालयात यिन अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडणूक प्रक्रिया यशस्वीरीत्या झाली. यिनच्या उपक्रमांमुळे लोकशाहीची प्रक्रिया नवमतदारांत रूजवणे शक्य होत आहे. जबाबदार नागरिक घडविले जात आहेत. तरुणवर्गात सामाजिक बांधिलकी निर्माण करणारे तसेच सुजाण नागरिक घडविण्याच्या दृष्टीने राबविण्यात येणारे उपक्रम स्तुत्य आहेत.
- डॉ. तेजस्विनी मुडेकर, प्राचार्य, कमला महाविद्यालय
कोट
11491
सकाळ माध्यम समूहातर्फे यिन निवडणुका यशस्वीपणे पार पडल्या. यात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. लोकशाहीच्या मूल्यांची रुजवन आणि तरुणांच्या नेतृत्वाला प्रोत्साहन देणे, या बाबतीत ही निवडणूक प्रेरणादायी ठरली. निवडणूक प्रक्रियेतील मतदार उमेदवार प्रत्यक्ष मतदान करणे मतमोजणी आणि निकाल हे समजावून घेण्याच्या बाबतीत विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता दिसली. अशाप्रकारच्या उपक्रमांच्या माध्यमातून सकाळ माध्यम समूह सतत प्रयत्नशील असतो याबद्दल आपणास सदिच्छा देतो.
- डॉ. टी. एम. पाटील, उपप्राचार्य, सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय, मुरगूड
कोट
11489
यिन खरोखर मुलांच्या कलागुणांना वाव देणारे व्यासपीठ आहे. त्यातून युवकांत विचारांची देवाण-घेवाण होते. विविध सामाजिक उपक्रमात ते हिरीरीने सहभागी होतात. हे उपक्रम त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास घडविणारे आहेत. यिन निवडणुकीतून त्यांना खूप काही शिकायला मिळाले आहे. मतदान प्रक्रियेसह सुजाण नागरिक कसा असतो, याचा अनुभव त्यांना घेता आला आहे.
- दिग्विजय भोसले, व्यवस्थापक संचालक, कॉन्टिनेंटल इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट ऑफ कॅटरिंग टेक्नॉलॉजी, कोल्हापूर
कोट
11485
महाविद्यालयीन स्तरावर झालेल्या यिन निवडणुका विद्यार्थ्यांच्या नेतृत्वगुणांना उभारणी देण्याचे काम अतिशय उत्तमपणे पार पाडत आहे. आजच्या तरुण पिढीकडे राजकारण एका चांगल्या मार्गाने नेण्याचा मानस दिसतो. राजकारणाची दशा आणि दिशा उत्तमरीत्या ठरवण्याचे व्यासपीठ ‘सकाळ’तर्फे उभे केले आहे. ही अतिशय अभिमानाची बाब आहे.
- रुधीर बारदेस्कर, प्राचार्य, डी. वाय. पाटील स्कूल ऑफ हॉस्पिटॅलिटी, कोल्हापूर
कोट
11483
यिनच्या निवडणुकांतून विद्यार्थ्यांना लोकशाही प्रक्रियेची माहिती मिळाली. त्यात त्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. त्यांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. सध्याचे राजकारण आणि निवडणुकांचे स्वरूप यातील फरकही त्यांना समजून घेता आला.
- डॉ. एस. बी. पाटील, प्राचार्य, डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ ॲग्रीकल्चरल इंजिनिअरिंग ॲंड टेक्नॉलॉजी, तळसंदे
कोट
11481
देशासह राज्यातील राजकारणाची माहिती विद्यार्थ्यांना वृत्तपत्रातून वाचायला मिळते. मात्र, राजकारण कसे असते, काय करावे लागते, याचा अनुभव त्यांना यिनच्या निवडणुकांतून घेता आला. विद्यार्थ्यांनी प्रचार करत निवडणुकीची रंगत वाढवली. लोकशाही प्रक्रिया समजून घेण्यात ते यशस्वी ठरले.
- डॉ. एल. डी. कदम, प्राचार्य, राजर्षी छत्रपती शाहू महाविद्यालय, कोल्हापूर
कोट
11479
लोकशाही प्रक्रिया समजून घेणे तरुण पिढीसाठी आवश्यक आहे. यिनच्या माध्यमातून त्यांनी ही संधी मिळाली. यिनच्या निवडणुकांत त्यांनी घेतलेला सहभाग महत्त्वाचा होता.
- डॉ. प्रफुल्ल चव्हाटे, प्रभारी प्राचार्य, भारती विद्यापीठाचे न्यू लॉ कॉलेज, कोल्हापूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.