आरपीएल लिलावात इर्षा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आरपीएल लिलावात इर्षा
आरपीएल लिलावात इर्षा

आरपीएल लिलावात इर्षा

sakal_logo
By

मुख्य फोटो : ७४३२१

आरपीएलसाठीच्या लिलावात ईर्ष्या
ठाकूर, शिंदे, गावडे, करूर, करंदीकर, फलारी यांच्यावर सर्वाधिक बोली
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ९ : सकाळ माध्यम समूह व रोटरी क्‍लब ऑफ कोल्हापूर आयोजित रोटरी प्रीमियर लीगच्या नवव्या हंगामासाठी चुरशीने लिलाव प्रक्रिया झाली. हॉटेल पर्ल येथे झालेल्या प्रक्रियेसाठी सहा संघांमध्ये ईर्ष्या होती. ही क्रिकेट स्पर्धा १२ ते १५ दरम्यान शास्त्रीनगर मैदानावर प्रकाश झोतात होणार आहे. स्पर्धेचे मुख्य प्रायोजक ऋतुराज संजय पाटील फौंडेशन आहे, तर हॉटेल पर्ल हॉस्पिटॅलिटी पार्टनर आहे.
सहा संघांमध्ये खेळाडू लिलाव प्रक्रियेमध्ये घमासान पाहायला मिळाली. प्रत्येक संघमालक आपला संघ कसा बळकट होईल, या साठी शर्तीचे प्रयत्न करताना दिसला. फलंदाज, गोलंदाज, अष्टपैलू, यष्टीरक्षकापासून कर्णधार कोण असू शकतो, या सर्वांची पडताळणी प्रत्येक खेळाडूंच्या नावाबरोबर सुरू होती. आपला संघ अधिक बळकट व्हावा, यासाठी सर्वजण प्रयत्न करत होते. निर्णायक क्षणी सामना फिरविण्याची कला असणाऱ्या खेळाडूंवर हजारोंचे डाव चालले होते. उत्साहपूर्ण आणि काही तणावाच्या वातावरणात आरपीएलच्या नवव्या मोसमासाठीची लिलाव प्रक्रिया पूर्ण झाली. या वेळी ‘सकाळ’चे सहायक उपसरव्यवस्थापक आनंद शेळके, संघ मालक स्वप्नील दीक्षित, डॉ. भरत खराटे, संजय कदम, डॉ. संजय देसाई, संग्राम पाटील, प्रदीप गांधी, अशोक सुर्वे, हॉटेल पर्लच्या कविता घाटगे, डॉ. भूषण शेंडगे, विनेश देसाई, संजय साळोखे, विजय यवलुजे, सूर्यकांत पाटील, डॉ. महादेव नरके, आनंद शेळके, राजेश आडके उपस्थित होते.

असे आहेत संघ
74386
आपली फार्मसी
संघमालक : केशव ऊर्फ दादासो कडवेकर
आयकॉन प्लेयर व्यंकटेश गायकवाड, सागर कामठे, रोहनराज शिंदे, राजदत्त सुतार, मृणाल परब, अमित केडगे, निवास वाघमारे, सुधीर नाईक, अभिनंदन वणकुद्रे, प्रवीण काजवे, संजय पाटील, प्रीतेश कर्णावत, सुहास मिठारी, सचिन गुंड, श्रीकांत झेंडे, संग्राम शेवरे.

74384
लॉंगलाइफ चॅम्पियन
संघमालक : संजय कदम
आयकॉन प्लेयर आदर्श शेट्टी, गौरव चव्हाण, मिथुन किराड, रवी खोत, मंजुनाथ सयंवर, ओंकार भगत, सचिन गाडगीळ, दाजीबा पाटील, गिरीश बारटक्के, रामचंद्र पाटील, विध्या बेडेकर, नारायण गावडे, संग्राम सरनोबत, संजय कदम, संजय साळोखे, सत्यजित पाटील.

74373
एमडब्लूजी सुपर किंग्स
संघ मालक : प्रदीप गांधी
आयकॉन प्लेयर धीरज पाटील, अभिजित ए. एच., सूरज रायगांधी, स्टीवन कॉटनहो, दीपक ठाकूर, नीलेश पाटील, नामदेव गुरव, अमित मिराशी, सचिन देशमुख, आशिष प्रभू, जावेद महत, अभिजित कोराने, अजित जाधव, आर. वाय. पाटील, प्रकाश जगदाळे, संग्राम पाटील, जिया मोमीन

74379
चाटे चॅम्प्स
संघमालक : प्रा. डॉ. भरत खराटे
आयकॉन प्लेयर विकास जाधव, विशाल कल्याणकर, सतगोंडा पाटील, रवी पावरा, सागर महामुनी, सूरज वाईंगडे, समाधान दांडेकर, राजू करूर, राहुल डूनून्ग, प्रसन्न सरदेसाई, विजय पांढरे, किरण वडगावकर, राहुल कुलकर्णी, राहुल रबडे, राजेश केसरे, मुकेश छुट्टाणी, सुशील काटकर.

74374, 74378
माई हुंडाई सिद्धिविनायक
संघमालक : तेज घाटगे , डॉ. संजय देसाई
आयकॉन प्लेयर रविराज शिंदे, नीलेश भादुले, अतुल भगत, प्रथमेश नाईक, योगेश नाईक, योगेश करंदीकर, नामदेव गावडे, जितेंद्र पार्टे, महादेव नरके, सचिन पाटील, इंद्रजित चव्हाण, शैलेश भोसले, रवी मायदेव, विशाल वडेर , राहुल नाईक, सचिन कदम, अभिजित भोसले.

74400,74401
आर.सी. गोवा
संघमालक : राजेश आडके, स्वप्नील दीक्षित
आयकॉन प्लेयर नीलेश मुळे, पंकज तेली, इम्तियाज शेख, दीपक प्रियोळकर, विनय सामंत, एकनाथ बारगूकर, आशिष शिरोडकर, रोहित कनवाडकर, गुरदीप जगदेव, संतोष चिकणे, उमेश नाईक, समीर फलारी, सचिन परांजपे, सरगम फलारी, राजेश आडके, विजय चौगले, प्रकाश इरकर.