
‘आरपीएल’चा थरार आजपासून
‘आरपीएल’चा थरार आजपासून
शास्त्रीनगर मैदानावर रंगणार स्पर्धा प्रकाशझोतात, सहा संघांमध्ये चुरस
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ११ : ‘सकाळ’ माध्यम समूह व रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सेंट्रल आयोजित सकाळ रोटरी प्रीमिअर लीग स्पर्धेच्या नवव्या हंगामाचा थरार उद्या (गुरुवार) पासून रंगणार आहे. एकूण सहा संघात प्रकाशझोतात स्पर्धा होणार असून, शास्त्रीनगर मैदानावर स्पर्धेची तयारी पूर्ण झाली आहे. स्पर्धेचे मुख्य प्रायोजक ऋतुराज संजय पाटील फौंडेशन आहे. हॉटेल पर्ल हॉस्पिटॅलिटी पार्टनर, तर अपोलो टायर्स असोसिएट पार्टनर आहेत.
स्पर्धेचे उद्घाटन डी. वाय. पाटील ग्रुपचे विश्वस्त पृथ्वीराज संजय पाटील, ‘सकाळ’चे संपादक संचालक श्रीराम पवार, कार्यकारी संपादक निखिल पंडितराव, ३१७० चे रोटरी गव्हर्नर व्यंकटेश देशपांडे यांच्या हस्ते व असिस्टंट गव्हर्नर अनिरुद्ध तगारे, कोल्हापूर सेंट्रलचे क्लब प्रेसिडेंट विजयकुमार यवलुजे, इव्हेन्ट चेअरमन सूर्यकांत पाटील - बुद्धीहाळकर, अपोलो टायर्स डिस्ट्रिक्ट मॅनेजर भगवान सावंत, हॉटेल पर्लचे डायरेक्टर कविता घाटगे, सेक्रेटरी रोटेरियन भूषण शेंडगे यांच्या उपस्थितीत होणार आहे.
रोटरी क्लबच्या सभासदांच्या खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने सलग नवव्या वर्षी स्पर्धा रंगणार आहे. रोटरी क्लब डिस्ट्रिक्ट ३१७० मधील सदस्यांसाठी ही स्पर्धा आहे. ‘रोटरी’चे सदस्यही क्रिकेटचे चाहते आहेत; तर रोटरी क्लब डिस्ट्रिक्ट ३१७० मधील सदस्य क्रिकेटमधील आपले कौशल्य दाखविण्यास उत्सुक आहेत. पश्चिम महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा ते कोकणात रोटरीचे सदस्य आहेत. स्पर्धेसाठी सहा हजारांहून अधिक रोटरी सदस्य उपस्थित राहणार आहेत. लिलाव पद्धतीने संघ बांधणी झाली असून हुबळी, धारवाड, पणजी, मडगाव, मालवण, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, बेळगाव, सांगली जिल्ह्यांतील रोटरी सदस्यांचा स्पर्धेत सहभाग असेल. लीग पद्धतीने सामने होणार आहेत.
चौकट
संघ व संघमालक असे
१) एम. डब्लू. जी. सुपरकिंग्स : प्रदीप गांधी
२) आपली फार्मसी : केशव ऊर्फ दादासो कडवेकर
३) माई ह्युंदाई सिद्धिविनायक ः तेज घाटगे, डॉ. संजय देसाई
४) चाटे सुपर किंग्ज ः प्रा. डॉ. भारत खराटे
५) आर. सी. गोवा ः राजेश आडके, स्वप्नील दीक्षित
६) लॉंगलाइफ चॅम्पियन्स : संजय कदम