दि कोल्हापूर अर्बन कडून १० टक्के लाभांश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दि कोल्हापूर अर्बन कडून १० टक्के लाभांश
दि कोल्हापूर अर्बन कडून १० टक्के लाभांश

दि कोल्हापूर अर्बन कडून १० टक्के लाभांश

sakal_logo
By

‘कोल्हापूर अर्बन’कडून
दहा टक्के लाभांश 
कोल्हापूर, ता. १४ : दि कोल्हापूर अर्बन को-ऑप. बँक लि. कोल्हापूर ची १०९ वि वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. सभेत सभासदांना त्यांच्या भाग भांडवलापोटी १० टक्के प्रमाणे लाभांश मंजुर करण्यात आला. रिझर्व्ह बँकेकडुन मागणीप्रमाणे १० टक्के प्रमाणे लाभांश वाटप करण्यास नुकतीच मंजुरी मिळाली. त्यानुसार बँकेकडुन १२ जानेवारीला सभासदांचे खातेवर लाभांश ची रक्कम जमा करण्यात आली. कोरोना विषाणू संसर्गामुळे मागील २ वर्षामध्ये व्यवसायामध्ये मर्यादित वाढ झालेने मागील २ वर्षे लाभांश वितरणासाठी रिझर्व्ह बँकेची परवानगी घ्यावी लागली आहे, परंतु चालु आर्थिक वर्षात बँकेच्या व्यवसायात व नफ्यात वाढ झालेली आहे. याकामी बँकेचे अध्यक्ष शिरीष कणेरकर, उपाध्यक्ष जयसिंगराव माने व संचालक मंडळाचे मार्गदर्शनानुसार बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वनाथन के यांनी पाठपुरावा करून लाभांश वाटपाबाबतची मंजुरी मिळविली.