कै.मेजर यादव ट्राँफी क गट क्रिकेट स्पर्धा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कै.मेजर यादव ट्राँफी क गट क्रिकेट स्पर्धा
कै.मेजर यादव ट्राँफी क गट क्रिकेट स्पर्धा

कै.मेजर यादव ट्राँफी क गट क्रिकेट स्पर्धा

sakal_logo
By

लोगो - कै.मेजर यादव ट्राँफी क गट क्रिकेट स्पर्धा 

हिरण्यकेशी फाउंडेशन
शिवनेरी स्पोर्ट्स अंतिम फेरीत
कोल्हापूर, ता. १६ : कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजित यादव कुंटुबीय पुरस्कॄत कै.मेजर यादव टी २० क गट साखळी क्रिकेट स्पर्धेतील पहिला उंपात्य सामना हिरण्यकेशी फाउंडेशन विरूध्द एम.जी.स्पोर्टस् यांच्या मध्ये झाला. सामन्यात हिरण्यकेशी फाउंडेशनने सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवला. 
दुसरा उंपात्य सामना श्री स्पोर्टस क्रिकेट असोसिएशन विरूध्द शिवनेरी स्पोर्टस् यांच्यामध्ये झाला. सामन्यात शिवनेरी ने दोन धावांनी विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला. प्रथम फलंदाजी करताना शिवनेरी ने २० षटकांत ७ बाद १४९ धावा केल्या. यामध्ये श्रेयस पाटील ४१, हर्षवर्धन जाधव ३८, अनुप माने १८ धावा केल्या. श्री स्पोर्टस कडून आदित्य पाटील २, शिवप्रसाद पाटील, नरेंद्र पाटील, व सुनिल चव्हाण यांनी प्रत्येकी १ बळी घेतला. उत्तरादाखल खेळताना श्री स्पोर्ट्स ने २० षटकांत ९ बाद १४७ धावा केल्या. यामध्ये रणजीत हजारे ४४, अक्षय पाटील २९, मयुर पाटील २३ धावा केल्या. शिवनेरी स्पोर्टस् कडुन गजानन गुरवने ४, रणजीत सलगरने २, प्रसाद उगवे व श्रेयस पाटील यांनी प्रत्येकी १ बळी घेतला.