
ढोली यांच्या नावाने युद्धकला प्रशिक्षण केंद्रासाठी प्रयत्न
76887
कोल्हापूर : सूरज ढोली यांच्या शोकसभे प्रसंगी उपस्थित खासदार प्रा. मंडलिक, विजय देवणे, सन्मती मिरजे, आसिफ मोकाशी, प्रमोद पाटील, विजय पाटील, हर्षल सुर्वे, उदय गायकवाड आदी.
ढोली यांच्या नावाने युद्धकला
प्रशिक्षण केंद्रासाठी प्रयत्न
खासदार मंडलिक; ‘बजापराव’मध्ये शोकसभा
कोल्हापूर, ता. १९ : शिवकालीन युद्धकला प्रशिक्षक सूरज ढोली यांच्या नावाने युद्धकला प्रशिक्षण केंद्र शासन स्तरावरून सुरू करण्यासाठी प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही खासदार प्रा. संजय मंडलिक यांनी आज येथे दिली.
ढोली यांना श्रध्दांजली वाहण्यासाठी आयोजित शोकसभेत ते बोलत होते. हिल रायडर्स अॅंड हायकर्ससह विविध गिर्यारोहक प्रेमीसंस्थांतर्फे बजापराव माने तालमीच्या सभागृहात बैठक झाली.
प्रा. मंडलिक म्हणाले, ‘‘ढोली युद्धकलेसाठी झोकून देणारे होते. त्यांच्या नावे केंद्र झाल्यास मराठमोळी युद्धकला पर्यटकांना पाहता येईल विविध संस्थांना केंद्रात कलेचे सादरीकरण करता येईल. त्यातून रोजगाराची संधीही मिळेल.’ हिल रायडर्सचे अध्यक्ष प्रमोद पाटील म्हणाले, ‘सूरजच्या स्मृतिप्रित्यर्थ दरवर्षी वंचित मुलांना मोफत रांगणा किल्ल्याची सैर घडविण्यात येईल. तेथे मर्दानी खेळाची प्रात्यक्षिकेही सादर होतील. दक्षिण दिग्विजय मशाल फेरीत विविध संस्थांचा सहभाग घडवून फेरी निघेल.’
बैठकीस विजय देवणे, सन्मती मिरजे, आसिफ मोकाशी, विजय पाटील, हर्षल सुर्वे, उदय गायकवाड, अनिल चौगुले, विनोद आडके, विनोद कांबोज, ऋषिकेश केसकर, प्रवीण चौगुले, महादेव नरके उपस्थित होते.