मुलींच्या खेलो इंडिया राज्य फुटबॉल लिग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुलींच्या खेलो इंडिया राज्य फुटबॉल लिग
मुलींच्या खेलो इंडिया राज्य फुटबॉल लिग

मुलींच्या खेलो इंडिया राज्य फुटबॉल लिग

sakal_logo
By

फुटबॉल लीगचे
आज उद्‍घाटन
कोल्हापूर, ता. २० : भारतीय खेल प्राधिकरणतर्फे खेलो इंडिया अंतर्गत १७ वर्षांखालील मुलीच्या फुटबॉल लीगचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा देशभरात विविध ठिकाणी होत आहे. कोल्हापुरात केएसएतर्फे येथील पोलो ग्राउंड २१ ते १७ फेब्रवारी दरम्यान सकाळच्या सत्रात स्पर्धा होणार आहे. यामध्ये जिल्ह्यातील छत्रपती वॉरियर्स, एस थ्री ॲकॅडमी, रिअल टच फुटबॉल ॲकॅडमी, श्री काडसिद्धेश्र्वर हायस्कूल, उषाराजे गर्ल्स हायस्कूल, भाई माधवरावजी बागल हायस्कूल अशा एकूण सहा संघांचा समावेश आहे. लीग पद्धतीने एकूण ३० सामने होणार आहेत. ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनतर्फे लीगच्या माध्यमातून उत्कृष्ट महिला खेळाडूंची निवड होईल. त्यांना राष्ट्रीय संघ प्रशिक्षण शिबिरामध्ये सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. लीगचे उद्‍घाटन उद्या (ता. २१) सकाळी साडेआठ वाजता विफा महिला समिती चेअरमन मधुरिमाराजे छत्रपती यांच्या हस्ते होणार आहे.