Mon, Jan 30, 2023

वीज बिल भरणा केंद्र सुरू
वीज बिल भरणा केंद्र सुरू
Published on : 21 January 2023, 3:49 am
महावितरणच्या विद्युत भवनात
वीज देयक भरणा केंद्र सुरू
कोल्हापूर : शहरातील ताराबाई पार्क परिसरातील महावितरणच्या विद्युत भवनमधील वीज देयक भरणा केंद्र पुन्हा सुरू करण्यात आले आहे. मध्यंतरीच्या काळात केंद्र तांत्रिक कारणामुळे बंद होते. महावितरणच्या ''ई- वॉलेट'' पद्धतीने ग्राहकांच्या सोईसाठी ते सुरू केले आहे. हे केंद्र सोमवार ते शनिवारपर्यंत दररोज सकाळी दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत सुरू राहील. याची वीज ग्राहकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन महावितरणने केले आहे. दरम्यान, ग्राहकांना महावितरण मोबाईल ॲपद्वारे किंवा महावितरणच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने नेटबँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, कॅश कार्ड, ई-वॉलेट, यूपीआयद्वारे वीज बिले भरण्याची सुविधा उपलब्ध आहे.