पोलीस अधीक्षक बलकवडींना आंतरिक सुरक्षा सेवा पदक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोलीस अधीक्षक बलकवडींना आंतरिक सुरक्षा सेवा पदक
पोलीस अधीक्षक बलकवडींना आंतरिक सुरक्षा सेवा पदक

पोलीस अधीक्षक बलकवडींना आंतरिक सुरक्षा सेवा पदक

sakal_logo
By

फोटो
...

पोलिस अधीक्षक बलकवडे यांना
आंतरिक सुरक्षा सेवा पदक जाहीर

राज्य महिला आयोगाकडूनही गौरव


सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २५ : गडचिरोली जिल्ह्यातील कामगिरीची दखल घेऊन उद्या साजरा होणाऱ्या प्रजासत्ताक दिनानिमित्त केंद्र शासनाने पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांना ‘आंतरिक सुरक्षा सेवा पदक’ जाहीर केलेले आहे. हे पदक महाराष्ट्र राज्याच्या पोलिस महासंचालकांच्या वतीने दिले जाते.
दरम्यान, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने तिसाव्या वर्धापन दिनानिमित्ताने अधीक्षक शैलेश बलकवडे तसेच वडगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संतोष घोळवे यांचा आज मुंबईतील सह्याद्री अतिथी गृहामध्ये विशेष गौरव केला. त्यांनी महिलांबाबतच्या गुन्ह्यात केलेल्या तपासासह विशेष कामगिरीबद्दल मंत्री दादासाहेब भुसे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाताई चाकणकर प्रमुख उपस्थित होत्या.
जिल्ह्यात ५१ बालविवाह रोखण्यात यश आले. यांसह भुदरगड राधानगरी तालुक्यात बेकायदेशीर गर्भलिंग निदान करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. खोची (ता. हातकणंगले) येथील गुन्ह्याच्या तपासामध्ये विशेष योगदान दिल्याबद्दल अधीक्षक बलकवडे आणि संतोष घोळवे यांचा विशेष सत्कार झाला आहे.
अधीक्षक बलकवडे हे गडचिरोली येथे कार्यरत असताना घातपात व देश विघातक कृत्य करण्याच्या तयारीत असलेल्या नक्षलींचे १० कॅम्प बहादूर जवानांचे साथीने उद्‌ध्वस्त केले. पोलिस व नक्षलवादी यांच्या झालेल्या चकमकीमध्ये एकूण २० नक्षलींना यमसदनी धाडण्यात यश प्राप्त केले. यामध्ये जहाल नक्षलींचा समावेश होता. गडचिरोली जिल्ह्यामध्ये हिंसक व देश विघातक कृत्य करणाऱ्या एकूण ५३ नक्षलींना अटक करण्यात गडचिरोली पोलिस दलास यश आले असून इतिहासात सर्वप्रथम एका संपूर्ण नक्षली दलम यांनी एके ४७ सारख्या हत्यारांसह आत्मसमर्पण करण्यात यश आले.
याची दखल घेऊन हा पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच गतवर्षी केंद्रशासनाने गडचिरोली येथे केलेल्या उल्लेखनीय कामगिरीनिमित्त अधीक्षक बलकवडे यांना ‘असाधारण असुचन्त्र कुशलता’ पदकाने गौरविले आहे.