झुंजार क्लब, संयुक्त जुना बुधवारचे विजय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

झुंजार क्लब, संयुक्त जुना बुधवारचे विजय
झुंजार क्लब, संयुक्त जुना बुधवारचे विजय

झुंजार क्लब, संयुक्त जुना बुधवारचे विजय

sakal_logo
By

79634
कोल्हापूर : श्रीमंत शाहू छत्रपती चषक के. एस. ए. लीग फुटबॉल स्पर्धेत बालगोपाल विरुद्ध जुना बुधवार यांच्या सामन्यातील क्षण. (मोहन मेस्त्री : सकाळ छायाचित्रसेवा)

फोटो : मोहन मेस्त्री
लोगो- श्रीमंत शाहू छत्रपती के. एस. ए. लीग

झुंजार क्लब, संयुक्त जुना बुधवारचे विजय
कोल्हापूर, ता. ३१ : श्रीमंत शाहू छत्रपती फुटबॉल लीग स्पर्धेत झुंजार क्लबने रंकाळा तालीम मंडळवर ४ - ० गोल फरकाने, तर संयुक्त जुना बुधवार पेठने बालगोपाल तालीम मंडळवर १- ० ने विजय मिळवला. झुंजार विरुद्ध रंकाळा यांच्यातील सामना एकतर्फी झाला. सुरुवातीपासून आक्रमक खेळ करणाऱ्या झुंजार क्लबने वर्चस्व राखले. सामन्याच्या ७ व्या मिनिटाला राजेश बोडेकर याने गोल नोंदवत संघाचे खाते उघडले. १९ व्या मिनिटाला कार्लोस नाला याने गोल नोंदवला, तर राजेश बोडेकर याने वैयक्तिक दुसरा व संघासाठी तिसऱ्या गोलची नोंद ४० व्या मिनिटाला करत सामना पूर्वार्धातच ३ - ० असा केला. उत्तरार्धात टोमास गोम्स याने ६२ व्या मिनिटाला गोल नोंदवत सामना ४ - ० असा केला. रंकाळा संघाचे प्रयत्न निष्फळ ठरले.
जुना बुधवार पेठ संघाने एकमेव गोलच्या जोरावर बालगोपाल तालीमला नमवले. सामन्याच्या पूर्वार्धात दोन्ही संघांनी गोलसाठी प्रयत्न केले. मात्र, यात दोन्ही संघांना यश आले नाही. उत्तरार्धात सामन्याच्या ५१ व्या मिनिटाला रिचमोन अवेटी याने गोल नोंदवत जुना बुधवारला आघाडी मिळवून दिली. यानंतर दोन्ही संघांना गोल नोंदवता न आल्याने सामना १ - ० असाच राहून जुना बुधवार संघाने जिंकला.
---------
आजचे सामने
दुपारी २ : फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळ विरुद्ध सम्राट नगर स्पोर्टस्‌
संध्याकाळी ४ : श्री शिवाजी तरुण मंडळ विरुद्ध बीजीएम स्पोर्टस्‌