सम्राटनगर चा विजय तर बीजीएम - खंडोबा बरोबरीत

सम्राटनगर चा विजय तर बीजीएम - खंडोबा बरोबरीत

81413

सम्राटनगरचा ‘संध्यामठ’वर विजय
बीजीएम स्पोर्टस् विरुद्ध खंडोबा तालीम मंडळ यांच्यातील सामना बरोबरीत

कोल्हापूर, ता. ८ : श्रीमंत शाहू छत्रपती फुटबॉल लीग स्पर्धेत सम्राटनगर स्पोर्टस् संघाने संध्यामठ तालीम मंडळवर २-१ गोलने विजय मिळवला, तर बीजीएम स्पोर्टस् विरुद्ध खंडोबा तालीम मंडळ यांच्यातील सामना गोल एक बरोबरीत राहिला. छत्रपती शाहू स्टेडियमवर स्पर्धा सुरु आहे.   
अवघ्या तीन मिनीटांच्या खेळामध्ये सामन्याचा निकाल लागलेला हा सामना रोमहर्षक ठरला. या सामन्यात सम्राटनगर संघ विजयी झाला. सामन्याच्या सुरवातीपासून दोन्ही संघानी आक्रमक सुरवात केली. गोलसाठी आसुसलेल्या संघांच्या आक्रमक प्रयत्नांनी सामन्यात उत्साह भरला. मात्र, आघाडी फळीच्या आक्रमणाबरोबरच मध्य फळी व बचाव फळीतील खेळाडूंनी साजेशा खेळ केला. सम्राटनगरच्या निलेश खापरे याने २४ व्या मिनिटाला गोल नोंदवत सामन्यात आघाडी घेतली. मात्र, पुन्हा खेळ सुरु होताच २५ व्या मिनिटाला संध्यामठच्या सिद्धेश साठेने गोल नोंदवत सामना बरोबरीत आणला. त्यांचा हा आनंद व्यक्त होऊन संपतो न संपतो इतक्यात २६ व्या मिनिटाला सम्राटनगरच्या कार्तिक जाधवने गोल नोंदवत सामना २-१ असा केला. या तीन मिनिटामध्ये झालेले आक्रमण, गोल व जल्लोषामुळे संपूर्ण मैदानात कमालीचे उत्साही वातावरण तयार झाले. यानंतर संपूर्ण वेळ दोन्ही संघाना गोल नोंदवणे शक्य न झाल्याने सामना सम्राटनगरने जिंकला.
बीजीएम विरुद्ध खंडोबा तालीम यांच्यातील सामना गोल एक बरोबरीत राहिला. बचावात्मक व संथ खेळामुळे सामना रटाळवाणा झाला. सामान्यांच्या ३१ व्या मिनिटाला बीजीएमकडून झालेले आक्रमण गोलमध्ये रूपांतरित झाले. रोहन कांबळे याने हा गोल नोंदवून सामान्यांच्या पूर्वार्धात  १-० अशी आघाडी घेतली. उत्तरार्धात दोन्ही संघांनी संयमी खेळ केला. अखेर खंडोबा संघाच्या अबूबकर-अल-हसन याने ६५ व्या मिनिटाला गोल नोंदवून सामना १-१ असा बरोबरीत आणला. अखेरपर्यंत हाच गोल फरक कायम राहिला.    

चौकट
आजचे सामने 
दुपारी २ वाजता : उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम विरुद्ध रंकाळा तालीम मंडळ 
सायंकाळी ४ वाजता : प्रॅक्टिस फुटबॉल क्लब विरुद्ध संयुक्त जुना बुधवार तालीम मंडळ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com