शिक्षा

शिक्षा

Published on

दोन फोटो
....


दोघा चोरट्यांना तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

आर. के. नगर परिसरात २०१९ मध्ये केली होती चोरी

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर, ता. ८ : आर. के. नगर, मोरेवाडी येथे घरफोडी करणाऱ्या दोन चोरट्यांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एच. आर. पाटील यांनी दोषी ठरविले. त्यांना प्रत्येकी नऊ हजार रुपयांचा दंड आणि तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली. सुनील श्रीहरी शिंदे (वय २४) आणि रामलू निळबा चव्हाण (वय ३४, दोघे रा. राऊतनगर, अकलूज, जि. सोलापूर) अशी त्यांची नावे आहेत.  १९ मे २०१९ रोजी घरफोडीची घटना घडली होती. करवीर पोलिस ठाण्याच्या हद्दीत या चोऱ्या झाल्या होत्या.
करवीर पोलिसांनी सांगितले की, आर. के. नगर येथील सागर चंद्रकांत कापसे यांच्या बंद घराचे कुलूप उचकटून चोरट्यांनी कपाटातील सुमारे लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता. पोलिसांनी तपास करून सुनील शिंदे आणि रामलू चव्हाण या दोन चोरट्यांना अटक केली. याबाबत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एच. आर. पाटील यांच्यासमोर सुनावणी झाली. सरकारी वकील  अमोल वीरकर यांनी काम पाहिले. 
दोन्ही बाजूच्या युक्तिवादानंतर न्यायदंडाधिकाऱ्यांनी दोन्ही चोरट्यांना दोषी ठरवले. त्यांना प्रत्येकी नऊ हजार रुपयांचा दंड आणि तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली. घरफोडीच्या तपास पथकात तत्कालीन पोलिस अधिकारी सुनील पाटील यांच्यासह प्रशांत माने, सुहास पाटील, गुरुप्रसाद झांबरे, राजेंद्र जरळी, प्रथमेश पाटील, किरण वावरे आदींचा सहभाग होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.