जुना बुधवारचा विजय , सम्राटनगर - रंकाळा बरोबरीत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जुना बुधवारचा विजय , सम्राटनगर - रंकाळा बरोबरीत
जुना बुधवारचा विजय , सम्राटनगर - रंकाळा बरोबरीत

जुना बुधवारचा विजय , सम्राटनगर - रंकाळा बरोबरीत

sakal_logo
By

फोटो-82326
--
लोगो-
श्रीमंत शाहू छत्रपती फुटबॉल लीग
-
रंकाळा तालीम मंडळ- सम्राटनगर स्पोर्टस् सामना बरोबरीत
...
जुना बुधवारचा ‘बीजीएम’वर विजय
कोल्हापूर, ता. १२ : श्रीमंत शाहू छत्रपती फुटबॉल लीग स्पर्धेत संयुक्त जुना बुधवार तालीम मंडळ संघाने बीजीएम स्पोर्टसवर २-१ गोलफरकाने विजय मिळविला. रंकाळा तालीम मंडळ विरुद्ध सम्राटनगर स्पोर्टस यांच्यातील सामना दोन गोल बरोबरीत राहिला. छत्रपती शाहू स्टेडियमवर स्पर्धा सुरू आहे. 
जुना बुधवार पेठ विरुद्ध बीजीएम स्पोर्टस् यांच्यातील सामना अटीतटीचा झाला. दोन्ही संघांनी आक्रमक खेळ करीत प्रतिस्पर्धी संघावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. जुना बुधवारच्या हरीश पाटील याने अवैधरीत्या अडविल्याबद्दल बीजीएम स्पोर्टस् संघाला पेनल्टी बहाल करण्यात आली. यावर सामन्याच्या ३८ व्या मिनिटाला वैभव राऊत याने गोल नोंदवत सामन्यात १-० अशी आघाडी घेतली. यानंतर बीजीएमच्या निखिल कांबळे याने अवैधरीत्या अडविल्याबद्दल जुना बुधवार संघाला पेनल्टी बहाल करण्यात आली. यावर रिचमॉन अवेटी याने ४४ व्या मिनिटाला गोल नोंदवत सामन्यात बरोबरी साधली. यानंतर दोन्ही संघांनी गोलसाठी केलेले प्रयत्न फोल ठरले. सामन्याच्या अखेरीस अधिकच्या वेळेत जुना बुधवारच्या प्रकाश संकपाळ याने गोल नोंदवत संघाला सामन्यात २-१ गोलफरकाने विजय मिळवून दिला. ‘बीजीएम’च्या कपिल शिंदे याला पंचांनी दोन यलो कार्ड बहाल केल्याने त्याच्यावर एक सामना बंदी असणार आहे.    
सम्राटनगर विरुद्ध रंकाळा तालीम यांच्यातील सामना बरोबरीचा ठरला. दोन्ही संघांनी तोडीस तोड खेळ करीत अखेरच्या क्षणापर्यंत समर्थकांना खिळवून ठेवले. आक्रमक खेळ करणाऱ्या दोन्ही संघांनी प्रतिस्पर्धी संघांवर दबाव राखला. पूर्वार्ध गोलशून्य बरोबरीत राहिला. उत्तरार्धात रंकाळ्याच्या हर्ष जरग याने ४३ व्या मिनिटाला गोल नोंदवत संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली; तर पाठोपाठ सम्राटनगरच्या नीलेश खापरे याने ५८ व्या मिनिटाला गोल नोंदवून बरोबरी साधली. यानंतर सामना आकारमान प्रतिआक्रमणाचा रंगला. सामना संपण्याच्या अधिकच्या वेळेत सम्राटनगरच्या किलेन दायमंदे याने गोल नोंदविला; तर पाठोपाठ रंकाळ्याच्या निखिल बचाटे याने गोल नोंदवत सामन्यात पुन्हा बरोबरी साधली. अखेर हा सामना दोन गोल बरोबरीत राहिला.

चौकट 
अबूबकर हसनवर दोन सामने बंदी
८ फेब्रुवारीला झालेल्या खंडोबा तालीम विरुद्ध बीजीएम यांच्यातील सामन्यात खंडोबा संघाचा अबूबकर अल हसन याने चुकीचा खेळ केल्याबद्दल पंचांनी रेड कार्ड दिले होते. त्याच्यावर दोन सामने खेळण्यास प्रतिबंधाची कारवाई केली आहे. 

आजचे सामने 
दुपारी २- उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम विरुद्ध संध्यामठ तरुण मंडळ 
दुपारी ४- प्रॅक्टिस फुटबॉल क्लब विरुद्ध खंडोबा तालीम मंडळ