
चेंबर चषक वर हॉटेल मालक संघाची मोहोर
82553
कोल्हापूर : चेम्बर ऑफ कॉमर्सतर्फे आयोजित क्रिकेट स्पर्धेत विजेत्या हॉटेल मालक संघास आमदार विनय कोरे यांच्या हस्ते पारितोषिक प्रदान करण्यात आले. या वेळी अध्यक्ष संजय शेटे, आनंद माने, संजय पाटील, शिवाजी पोवार, प्रदीपभाई कापडिया, सचिन शानभाग, धनंजय दुग्गे.
चेंबर चषक हॉटेल मालक संघाकडे
कन्झ्युमर प्रोडक्टस् डिस्ट्रीब्युटर्स असोसिएशन उपविजेता
कोल्हापूर, ता. १३ : झंवर ग्रुप पुरस्कृत चेंबर चषक क्रिकेट स्पर्धेत आज झालेल्या अंतिम सामन्यात कोल्हापूर हॉटेल मालक संघाने कन्झ्युमर प्रोडक्ट डिस्ट्रीब्युटर्स वेलफेअर असोसिएशनला पराभूत करून चषकावर आपली मोहोर उमटवली. विजेत्या उपविजेत्या संघाना आमदार विनय कोरे यांच्या हस्ते गौरवण्यात आले.
प्रथम फलंदाजी करताना हॉटेल मालक संघाने १० षटकांत १२६ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल कन्झ्युमर प्रोडक्ट डिस्ट्रीब्युटर्स वेलफेअर असोसिएशनचा संघ ६२ धावांवर आटोपला. स्पर्धेतील मालिकावीर व उत्कृष्ट फलंदाज चा पुरस्कार क्रिडाईच्या सचिन परांजपे, उत्कृष्ट गोलदांज हॉटेल मालक संघाचा प्रसाद उगवे, अंतिम सामन्याचा सामनावीर हॉटेल मालक संघाचा अर्जुन वाळवेकर याने पटकावला.
हॉटेल मालक संघ व मोबाईल सेल्स असोसिएशन यांच्यात झालेल्या पहिल्या उपांत्य सामन्यात हॉटेल मालक संघाने बाजी मारत अंतिम सामन्यात धडक दिली, तर दुसऱ्या उपांत्य सामन्यात कन्झ्युमर प्रोडक्टस् असोसिएशनने ‘क्रिडाई’ला नमवत अंतिम सामन्यात धडक दिली. या वेळी चेंबरचे अध्यक्ष संजय शेटे, उपाध्यक्ष शिवाजी पोवार, संजय पाटील, झंवर उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक नरेंद्र झंवर, क्रिडाईचे अध्यक्ष विद्यानंद बेडेकर, जनसुराज्य पक्षाचे अध्यक्ष समीत कदम, मानद सचिव धनंजय दुग्गे, वैभव सावर्डेकर, राजू पाटील, आनंद माने, प्रदीप कापडिया, क्रिकेट कमिटीचे चेअरमन संपत पाटील, संचालक राहुल नष्टे, प्रशांत शिंदे, अजित कोठारी, अनिल धडाम, प्रकाश पुणेकर, दादा कडवेकर, हॉटेल मालक संघाचे अध्यक्ष उज्वल नागेशकर, इव्हेंट मॅनेजमेंट असोसिएशनचे सुजित चव्हाण, रमेश लालवाणी, सोहनलाल कोठारी, राज शेटे व संचालक तसेच विविध संघटना प्रतिनिधी उपस्थित होते.