गो ग्रीन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गो ग्रीन
गो ग्रीन

गो ग्रीन

sakal_logo
By

‘गो ग्रीन’द्वारे वर्षभरात २६ लाखाची बचत
कोल्हापूर : महावितरणच्या गो ग्रीन सेवेद्वारे कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील ग्राहकांनी वर्षभरात २६ लाख २७ हजार ४०० रूपयांची बचत केली आहे. ‘कागद वाचवा-पैसेही वाचवा’ अभियानांतर्गत पर्यावरणपूरक गो ग्रीन सेवेसाठी नोंदणी करणाऱ्या ग्राहकांना महिन्याकाठी छापील बिलाऐवजी नोंदणीकृत ई- मेलवर वीज बिल पाठविले जाते. या सेवेचा लाभ घेणाऱ्या ग्राहकांना दर महिन्याला वीज बिलात १० रुपयांची सवलत दिली जाते. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील २१ हजार ८९५ वीज ग्राहक वार्षिक २६ लाख २७ हजार ४०० रुपयांची आर्थिक बचत करत आहेत. यात कोल्हापूर जिल्ह्यातील १३ हजार २७३ तर सांगलीच्या ८ हजार ६६२ वीज ग्राहकांचा समावेश आहे.
गो ग्रीन सेवेकरिता नोंदणी करण्यासाठी महावितरणच्या अधिकृत संकेतस्थळावरील https://pro.mahadiscom.in/Go-Green/gogreen.jsp लिंकचा वापर करावा.अथवा नजीकच्या महावितरण कार्यालयात जाऊन गो ग्रीन सेवेसाठी नोंदणी करू शकतात. तरी वीज ग्राहकांनी गो ग्रीन सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.