शिवदुर्ग संवर्धन निवेदन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवदुर्ग संवर्धन निवेदन
शिवदुर्ग संवर्धन निवेदन

शिवदुर्ग संवर्धन निवेदन

sakal_logo
By

किल्ले राजगडसंबंधीचा आदेश मागे घ्यावा;
शिवदुर्ग संवर्धन आंदोलन समितीची मागणी
कोल्हापूर : किल्ले राजगडावर रात्रीच्या वेळी मुक्काम न करण्याचा आदेश मागे घ्यावा, या मागणीचे निवेदन शिवदुर्ग संवर्धन आंदोलन समितीतर्फे पुरातत्त्व खात्याचे संचालक तेजस गर्गे यांना आज येथे देण्यात आले. सूर्योदय ते सूर्यास्तापर्यंत श्री. गर्गे यांनी राजगड अभ्यासपूर्णरीत्या पाहून परत यावे. त्यांना गडप्रेमींकडून एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करीत असल्याचे या वेळी सांगण्यात आले. कसबा बावडा येथील लक्ष्मी विलास पॅलेस येथे ते आले होते. त्या वेळी निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे, की राजगड किल्ला राज्य संरक्षित स्मारक असून, येथे पर्यटकांसह कोणत्याही व्यक्तीस रात्रीचा मुक्काम करण्यास बंदी घालण्यात आली आहे. या आदेशाप्रमाणे श्री. गर्गे यांनी स्वतः एकदिवसीय राजगड किल्ला अभ्यास दौरा काढावा. शिवप्रेमींसोबत दिलेल्या मुदतीत सूर्योदय ते सूर्यास्तापर्यंत पूर्ण राजगड अभ्यासपूर्ण पाहून परत गड पायथ्याशी यावे. राजगड दौरा पूर्ण यशस्वी केल्यास रात्रीच्या गडावरील बंदीचा आदेश मान्य करू. अन्यथा गडबंदीचा आदेश मागे घ्यावा. शिष्टमंडळात अमित आडसुळे, हर्षल सुर्वे, राम यादव, रविराज कदम, प्रज्वल गोडसे यांचा समावेश होता.