एफ.सी.बायर्न महाराष्ट्र कप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एफ.सी.बायर्न महाराष्ट्र कप
एफ.सी.बायर्न महाराष्ट्र कप

एफ.सी.बायर्न महाराष्ट्र कप

sakal_logo
By

लोगो-
एफ. सी. बायर्न महाराष्ट्र कप

महाराष्ट्र, संजीवन, पोद्दार,
लोहिया उपांत्य फेरीत
कोल्हापूर, ता. १८ : एफ. सी. बायर्न महाराष्ट्र कप फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत महाराष्ट्र हायस्कूल, संजीवन पब्लिक स्कूल, पोद्दार इंग्लिश स्कूल, स. म. लोहिया हायस्कूल संघांनी प्रवेश केला.
राज्यात फुटबॉल खेळाच्या विकास व प्रसारासाठी फुटबॉल क्लब बायर्न म्युनिक, जर्मनीबरोबर क्रीडा आणि युवक सेवा संचालनालयातर्फे सामंजस्य करार करण्यात आला असून, राज्यातून २० मुलांचा संघ प्रशिक्षणासाठी जर्मनीला पाठविण्यात येईल. यासाठी १४ वर्षांखालील मुलांच्या जिल्हा, विभाग व राज्य पातळीवरील स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या स्पर्धेला विभागीय क्रीडा संकुल मैदानावर सुरुवात झाली.