सामना मंडळ ने तर स्पर्धा दिलबहारने जिंकली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सामना मंडळ ने तर स्पर्धा दिलबहारने जिंकली
सामना मंडळ ने तर स्पर्धा दिलबहारने जिंकली

सामना मंडळ ने तर स्पर्धा दिलबहारने जिंकली

sakal_logo
By

83720
कोल्हापूर : शाहू छत्रपती केएसए लीग फुटबॉल स्पर्धेचा विजेता दिलबहार तालीम मंडळ संघाला चषक प्रदान करताना श्रीमंत शाहू छत्रपती महाराज. सोबत युवराज मालोजीराजे छत्रपती, मधुरिमाराजे छत्रपती, माणिक मंडलिक, नंदू बामणे, दीपक शेळके, नितीन जाधव, भाऊ घोडके, मनोज जाधव, संभाजी म्हांगोरे.
83721
कोल्हापूर : स्पर्धेचा उपविजेता शिवाजी तरुण मंडळ संघाला चषक प्रदान करताना श्रीमंत शाहू छत्रपती महाराज. सोबत युवराज मालोजीराजे छत्रपती, मधुरिमाराजे छत्रपती, माणिक मंडलिक, नंदू बामणे, दीपक शेळके, नितीन जाधव, भाऊ घोडके, मनोज जाधव, संभाजी म्हांगोरे.

83714
83715
83716
83717
83718

लोगो - श्रीमंत शाहू छत्रपती फुटबॉल लीग

दिलबहार तालीम लीगचा विजेता
सामना जिंकत मंडळकडे उपविजेतेपद, खंडोबा तालीम तिसऱ्या क्रमांकावर
कोल्हापूर, ता. १८ : श्रीमंत शाहू छत्रपती फुटबॉल लीग स्पर्धेत सर्वाधिक १४ गुणांसह दिलबहार तालीम मंडळ विजयी ठरले. श्री शिवाजी तरुण मंडळ संघाने १३ गुणांसह उपविजेतेपद पटकावले, तर १० गुणांसह खंडोबा तालीम मंडळ संघ तिसऱ्या क्रमांकावर राहिला. सर्वाना श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते गौरवण्यात आले. यावेळी केएसए अध्यक्ष मालोजीराजे छत्रपती, मधुरिमाराजे छत्रपती उपस्थित होते.
श्री शिवाजी तरुण मंडळ विरुद्ध दिलबहार तालीम मंडळ यांच्यातील सामन्यात मंडळ संघाने १ - ० गोलने विजय मिळवला. स्पर्धेच्या अखेरच्या सामन्यात विजयाच्या इराद्याने मैदानावर उतरलेल्या दोन्ही संघांनी उत्कृष्ट खेळ केला. दोन्ही संघांच्या आक्रमण प्रतिआक्रमणामुळे सामन्यात रंगत आली. पूर्वार्ध गोल शून्य बरोबरीत राहिला. उत्तरार्धात दिलबहार संघांने अधिक आक्रमक खेळ करत मंडळ संघावर दबाव आणला मात्र गोल नोंदवता आले नाही. सामन्याच्या ६१ व्या मिनिटाला मंडळच्या करीम याने दिलेल्या फ्री किक पासवर रोहन अडनाईक याने हेडद्वारे गोल करत सामन्यात १ - ० अशी आघाडी घेतली. यानंतर दिलबहार संघाने काही आक्रमक चाली रचल्या मात्र गोल नोंदवता आले नाही. अखेरपर्यंत हीच आघाडी कायम राहत मंडळने सामना जिंकला.
कोल्हापूर पोलिस विरुद्ध फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळ यांच्यातील सामना गोल शून्य बरोबरीत राहिला. या बरोबरीसह सीनिअर गटामध्ये फुलेवाडी संघाने आपले अव्वल स्थान कायम राखले. तर झुंजार क्लब द्वितीय व संध्यामठ तरुण मंडळ तिसऱ्या स्थानावर आहे.
संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना स्पोर्टस्‌ सायकल देऊन गौरवण्यात आले. यावेळी माणिक मंडलिक, संभाजी पाटील - मांगुरे, नंदकुमार बामणे, दीपक घोडके, राजेंद्र दळवी, नितीन जाधव, संग्रामसिंह यादव, दीपक शेळके, संजय पोरे उपस्थित होते. स्पर्धेचे समालोचन विजय साळोखे यांनी केले.

स्पर्धेतील उत्कृष्ट
फॉरवर्ड : संकेत मेढे - खंडोबा तालीम मंडळ
हाफ : रोहित देसाई - पाटाकडील तालीम मंडळ
डिफेन्स : प्रमोदकुमार पांडे - दिलबहार
गोलकिपर : मयुरेश चौगुले - श्री शिवाजी तरुण मंडळ
मालिकावीर : स्वयंम साळोखे - दिलबहार तालीम मंडळ
---------------
चौकट
सिस्टीम, जनरेटर तयारच...
दिलबहार तालीम मंडळ संघ लीग विजेता ठरणार हे अंकतालिकेवरून आधीच स्पष्ट झाले होते. यामुळे समर्थकांनी मैदानाबाहेर ध्वनी यंत्रणा सज्ज ठेवली होती. सामना सुरू होताच मैदानाबाहेर ट्रॉलीवर साऊंड सिस्टीम व मागे मोठ्या गाडीतून जनरेटर अशी जय्यत तयारी केली होती. सामना संपताच मैदानाबाहेर समर्थकांनी जल्लोष करत गाण्यावर ठेका धरला.