
कै. वसंतराव चौगुले ब गट क्रिकेट स्पर्धा
कै. वसंतराव चौगुले ब गट क्रिकेट स्पर्धा
रमेश कदम क्रिकेट ॲकॅडमी,
नागाळा पार्क युवक विजयी
कोल्हापूर, ता. २१ : कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजित व श्री.वसंतराव चौगुले नागरी सहकारी पंतसंस्था पुरस्कॄत वसंतराव चौगुले ब गट क्रिकेट स्पर्धेतील आजचा सामना सिध्देश्वर किक्रेट ॲकॅडमी विरूध्द रमेश कदम किक्रेट ॲकॅडमी यांच्यामध्ये झाला. सामन्यात रमेश कदम किक्रेट ॲकॅडमीने ५ विकेटनी विजय संपादन केला. प्रथम फलदांजी करताना सिध्देश्वर किक्रेट ॲकॅडमीने ३६ षटकांत ९ बाद १८६ धावा केल्या. यामध्ये भाऊसाहेब लाड ५९, विजय लाड २६ धावा केल्या. रमेश कदम किक्रेट ॲकॅडमीकडुन चेतन नार्वेकरने ३, देवरणवीर थोरात व क्षितीज पाटील यांनी प्रत्येकी २, स्वप्नील कदम व भारत जाट यांनी प्रत्येकी १ बळी घेतला. उत्तरादाखल खेळताना रमेश कदम किक्रेट ॲकॅडमीने ३१.२ षटकांत ५ बाद १९० धावा केल्या. यामध्ये करण वाघमोडे ३५, देवरणवीर थोरात नाबाद ३४, पार्थ गणबावले व हर्षवर्धन श्रीवास्तव प्रत्येकी ३३ धावा केल्या. सिध्देश्वर कडुन दिपक यादवने २, सचिन कुंभार, विशाल जमनिक व विजय लाड यांनी प्रत्येकी १ बळी घेतला.
नागाळा पार्क युवक मंडळ विरूध्द फायटर्स स्पोर्टस् क्लब ब यांच्यामध्ये झालेल्या सामन्यात नागाळा पार्क युवक मंडळाने ५९ धावानी विजय मिळवला. प्रथम फलदांजी करताना नागाळा पार्क युवक मंडळाने ४० षटकांत ६ बाद २३६ धावा केल्या. उत्तरादाखल खेळताना फायटर्स स्पोर्टस् क्लब ब ने ३३.४ षटकांत सर्वबाद १७७ धावा केल्या.