Fri, March 24, 2023

निकिताला राज्य सायकलिंग मध्ये सुवर्ण
निकिताला राज्य सायकलिंग मध्ये सुवर्ण
Published on : 22 February 2023, 5:03 am
12165
निकिताला राज्य सायकलिंगमध्ये सुवर्ण
कोल्हापूर, ता. २२ : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा कार्यालय औरंगाबाद यांच्यावतीने घेतलेल्या राज्यस्तरीय शासकीय शालेय रोड सायकलिंग स्पर्धेमध्ये निकिता शिंदे हिने सुवर्णपदक पटकाविले. १४ वर्षाखालील ही स्पर्धा औरंगाबादला झाली. निकिताने मुलीच्या टाईम ट्रायल प्रकारात पदक पटकावले. ती क्रीडा प्रबोधिनी, पुणे येथील सायकलिंग एक्सलन्स सेंटरमध्ये सराव करत आहे. तिला दीपाली निकम-पाटील, दीपाली शिळधनकर, कपिल कोळी व उदय पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.