बीजीएम - झुंजार खेळाडूंची फ्रीस्टाईल हाणामारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बीजीएम - झुंजार खेळाडूंची फ्रीस्टाईल हाणामारी
बीजीएम - झुंजार खेळाडूंची फ्रीस्टाईल हाणामारी

बीजीएम - झुंजार खेळाडूंची फ्रीस्टाईल हाणामारी

sakal_logo
By

84689
कोल्हापूर : सतेज चषक फुटबॉल स्पर्धेवेळी बीजीएम विरुद्ध झुंझार क्लब यांच्या सामन्यावेळी दोन्ही संघांचे खेळाडू परस्परांना भिडले आणि हाणामारी झाली. (मोहन मेस्त्री : सकाळ छायाचित्रसेवा)

बीजीएम-झुंजार खेळाडूंमध्ये
मैदानात फ्रीस्टाईल हाणामारी
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २२ : सतेज चषक फुटबॉल स्पर्धेत आज बीजीएम स्पोर्टस्‌ व झुंजार क्लबचे खेळाडू मैदानावरच भिडले. सामना संपायला काही वेळ शिल्लक असताना झालेल्या या हाणामारीमुळे विघ्न निर्माण झाले.
स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी बीजीएम स्पोर्टस्‌ व झुंजार क्लब दोन्ही संघ मैदानावर होते. सामना संपता संपता काही वेळ शिल्लक असताना दोन्ही संघांतील खेळाडूंमध्ये वाद झाला. एकमेकांना शिवीगाळ करत खेळाडू एकमेकांची गळपट्टी धरून भांडू लागले. अचानक झालेल्या या प्रकारामुळे दोन्ही संघांतील खेळाडू येथे एकत्र आले. त्यातून वाद वाढला. अचानक एकमेकांशी भिडणाऱ्या खेळाडूंची संख्या वाढत गेली व वादाचे रूपांतर मोठ्या भांडणात झाले. खेळाडूंमधील भांडण मिटणार तोपर्यंत दोन्ही संघातील राखीव खेळाडू एकमेकांच्या अंगावर धावून गेले. राखीव खेळाडूंची भांडणे झाली म्हणून मैदानातील सर्व खेळाडू यामध्ये सामील झाले. या हाणामारीत खुर्चीदेखील मोडली. अखेर संयोजकांना मैदानावर येऊन परिस्थितीवर नियंत्रण मिळवावे लागले. मैदानावर असभ्य वर्तन करणाऱ्या दोन्ही संघांतील चार खेळाडूंना पंचांनी रेड कार्ड दाखवत बाहेरचा रस्ता दाखवला.
प्रेक्षक कमी होते म्हणून दोन्ही संघांतील सामना समर्थकांच्या दृष्टीने ‘हाय व्होल्टेज’ नव्हता. यामुळे मैदानावर प्रेक्षकांची संख्या मर्यादित होती. जास्त समर्थक असते तर मैदानावर भिडणाऱ्या खेळाडूंना बघून समर्थदेखील आपापसात भिडतात. याचे पर्यवसान मैदानाबाहेरदेखील उमटू शकते.