
कै. वसंतराव चौगुले ब गट क्रिकेट स्पर्धा
लोगो : कै. वसंतराव चौगुले ब गट क्रिकेट स्पर्धा
फायटर्स स्पोर्टस् क्लब ब व एमएसईबी (महावितरण) विजयी
कोल्हापूर, ता. २२ : जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजित व श्री. वसंतराव चौगुले नागरी सहकारी पतसंस्था पुरस्कॄत कै. वसंतराव चौगुले ब गट क्रिकेट स्पर्धेतील आजचा सामना भिडे स्पोर्टस् ब विरूध्द फायटर्स स्पोर्टस् क्लब ब यांच्यात झाला. सामन्यात फायटर्स स्पोर्टस् क्लब ‘ब’ने ६ विकेटनी विजय मिळवला. प्रथम फलदांजी करताना भिडे स्पोर्टस् ‘ब’ने ४० षटकांत ६ बाद २०० धावा केल्या. यामध्ये प्रवीण येडेकर नाबाद १०० धावा केल्या. फायटर्स स्पोर्टस् क्लब ‘ब’कडून अक्षय पवारने ३, निहाल शेख, शुभंकर माने व अदित्य भोसले यांनी प्रत्येकी १ बळी घेतला. उत्तरादाखल खेळताना फायटर्स स्पोर्टस् क्लब ‘ब’ने २८.३ षटकांत ४ बाद २०३ धावा केल्या. यामध्ये विनायक हबीब १०१ धावा केल्या. भिडे स्पोर्टस्कडून विनायक मानेने ३ व युवराज मांडेकरने १ बळी घेतला.
दुसरा सामना एस. पी. किकेट क्लब, चंदगड विरूध्द एमएसईबी (महावितरण) यांच्या मध्ये झाला. एमएसईबी (महावितरण) ने ५२ धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना एमएसईबीने ३४.३ षटकांत सर्वबाद २४२ धावा केल्या. अशोक पहाड ७८, प्रशांत भोसले ७०, धावा केल्या. एस. पी. किकेट क्लबकडून सुनील यमटेकरने ३, सिध्देश गावडे व राकेश चिलमे यांनी प्रत्येकी २, जोतिबा पाटील व शुभम पाटील यांनी प्रत्येकी १ बळी घेतला. उत्तरादाखल खेळताना एस. पी. किकेट क्लबने ३५.५ षटकांत सर्वबाद १९० धावा केल्या. वैभव आंबुलकर ४७, जोतिबा पाटील ४३ धावा केल्या. एमएसईबीकडून सचिन चव्हाणने ४, प्रशांत भोसलेने ३, सतिश पाटील व अशोक पहाड यांनी प्रत्येकी १ बळी घेतला.