राष्ट्रीय विज्ञान दिन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राष्ट्रीय विज्ञान दिन
राष्ट्रीय विज्ञान दिन

राष्ट्रीय विज्ञान दिन

sakal_logo
By

डॉ. अविनाश शर्मा यांचे व्याख्यान

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठात राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त राष्ट्रीय पेशी विज्ञान संस्थेतील डॉ. अविनाश शर्मा यांचे अंटार्क्टिका खंडावर आधारित संशोधनपर व्याख्यान झाले. या वेळी प्र- कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील यांनी विज्ञान व पर्यावरणीय समस्यांच्या उपायाबाबत मार्गदर्शन केले. प्रा. डॉ. सरिता ठक्कार यांनी शास्त्र व तंत्रज्ञानाबाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली. प्रा. डॉ. के. डी. सोनवणे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. आसावरी जाधव यांनी आभार मानले. दरम्यान, उद्या (ता. २८) राष्ट्रीय विज्ञान दिन असून, त्यानिमित्त २४ फेब्रुवारीपासून विविध व्याख्याने, स्पर्धा व शास्त्रीय उपकरणांचा वापर विषयावर प्रदर्शन कार्यक्रमांचे आयोजन केल्याचे सांगण्यात आले. उद्या (ता. २८) सकाळी दहा ते दुपारी अडीचपर्यंत पर्यावरणशास्त्र अधिविभागात विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध वैज्ञानिक प्रतिकृती आणि उपकरणांची मांडणी केली जाणार आहे. विविध अधिविभागातील प्रयोगशाळा, शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी, नागरिकांसाठी उपकरणे पाहण्यास खुली राहतील. याचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.