आप निदर्शने | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आप निदर्शने
आप निदर्शने

आप निदर्शने

sakal_logo
By

12227
कोल्हापूर : दिल्लीचे उपमुख्यमंत्री सिसोदिया यांच्या अटकेविरोधात छत्रपती शिवाजी महाराज चौकात निदर्शने करताना आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते.
....

आम आदमी पक्षाची निदर्शने

कोल्हापूर : दिल्लीचे उपमुख्यमंत्री सिसोदिया यांच्या अटकेविरोधात आम आदमी पक्षातर्फे (आप) छत्रपती शिवाजी महाराज चौकात आज निदर्शने करण्यात आली. सिसोदिया यांना सीबीआयने कथित मद्य धोरण घोटाळ्याच्या आरोपाखाली अटक केली. त्याचे पडसाद कोल्हापुरात उमटले. अटकेचा निषेध करण्यासाठी कार्यकर्त्यांनी ‘सर्वोत्कृष्ट शिक्षणमंत्री मनीष सिसोदिया यांच्या अटकेचा धिक्कार असो’, ‘खोट्या आरोपांखाली अटक करणाऱ्या सीबीआयचा धिक्कार असो’, ‘दडपशाही करणाऱ्या केंद्र सरकारचा धिक्कार असो’, ‘जेल के ताले तुटेंगे, मनीष सिसोदिया छुटेंगे,’ अशा घोषणा दिल्या. ‘आप’चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई यांनी केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून केंद्र सरकार विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे तसेच खोट्या आरोपांमध्ये अडकवून जेलमध्ये टाकण्याचा केंद्र सरकारचा डाव असल्याचा आरोप केला. यावेळी जिल्हाध्यक्ष नीलेश रेडेकर, उत्तम पाटील, अभिजित कांबळे, सूरज सुर्वे, अमरजा पाटील, संजय साळोखे, दुष्यंत माने, विजय हेगडे, राकेश गायकवाड, प्रथमेश सूर्यवंशी, बबन भालेराव उपस्थित होते.