विद्यार्थ्यांनी विज्ञाननिष्ठ झाले पाहिजे : डॉ. जाधव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विद्यार्थ्यांनी विज्ञाननिष्ठ 
झाले पाहिजे : डॉ. जाधव
विद्यार्थ्यांनी विज्ञाननिष्ठ झाले पाहिजे : डॉ. जाधव

विद्यार्थ्यांनी विज्ञाननिष्ठ झाले पाहिजे : डॉ. जाधव

sakal_logo
By

विद्यार्थ्यांनी विज्ञाननिष्ठ
झाले पाहिजे : डॉ. जाधव
सांगवडेवाडी, ता. २ : जात, धर्म, पंथ, अंधश्रद्धा या गोष्टीकडे दुर्लक्ष करून वेगाने बदलत चाललेल्या समाज व्यवस्थेमध्ये आधुनिकतेची कास धरून विद्यार्थ्यांनी विज्ञाननिष्ठ बनले पाहिजे, असे आवाहन शहाजी लॉ कॉलेजचे प्रा. डॉ. अतुल जाधव यांनी सांगवडे येथे सांगवडे शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सांगवडे माध्यमिक विद्यालय व एन. एस.पाटील प्राथमिक विद्यालय येथे राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने भरवण्यात आलेल्या अपूर्व विज्ञान प्रदर्शनाच्या उद्‍घाटनप्रसंगी बोलताना केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका अश्विनी पाटील होत्या
प्रारंभी अतुल जाधव यांनी डॉक्टरेट पदवी संपादन केलेबद्दल संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला. प्रदर्शनामध्ये शंभर विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन प्रजन्यसुतक, ऊर्जा निर्मिती, हृदयाची कार्य प्रणाली, पावसाच्या पाण्याचे साठवणूक, पाण्याची घनता या विविध विषयावरील प्रयोगाची मांडणी केली होती. प्रकाश पाटील, विद्या नेरलेकर, महेशकुमार वडेर, एस. बी. पाटील, प्रदीप येवारे, पी. आर. नलवडे, विद्यार्थी उपस्थित होते. ऋषिकेश सासणे यांनी सूत्रसंचालन केले. अमर बोभाटे यांनी आभार मानले.