
कोल्हापूरचे सात जण एमसीए च्या समितीवर
86743
अभिजित भोसले
86744
अमृता शिंदे
86745
अतुल गायकवाड
86746
चंदाराणी कांबळे
86747
केदार गयावळ
86749
संग्राम अतितकर
86750
शैलेश भोसले
कोल्हापूरचे सात जण
‘एमसीए’च्या समितीवर
कोल्हापूर, ता. ४ : नुकत्याच महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन पुणे यांच्या तर्फे २०२२-२३ या चालू हंगामासाठी विविध उपसमितीची घोषणा केली. यामध्ये कोल्हापूरच्या सात जणांची विविध पदावर निवड झाली.
यामध्ये माजी रणजी खेळाडू व कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन सिनीयर निवड समितीचे सदस्य संग्राम अतितकर यांची महाराष्ट्र रणजी संघ निवड समितीच्या अध्यक्षपदी, माजी भारतीय कसोटी व एकदिवशीय महिला खेळाडू अमॄता शिंदे यांची महाराष्ट्र १५ वर्षाखालील महिला संघ निवड समितीच्या अध्यक्षपदी, माजी रणजी खेळाडू अतुल गायकवाड यांची १९ वर्षाखालील महाराष्ट्र संघ व्यवस्थापक पदी, माजी रणजी खेळाडू व कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन ज्युनियर निवड समितीचे सदस्य शैलेश भोसले यांची यांची १९ वर्षाखालील महाराष्ट्र संघ निवड समितीच्या सदस्यपदी, कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान सचिव केदार गयावळ यांची महाराष्ट्र स्पर्धा कमिटी सदस्यपदी, माजी १९ वर्षाखालील महाराष्ट्र संघाचे खेळाडू व कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान खजानिस अभिजीत भोसले यांची व माजी महाराष्ट्र महिला संघाची खेळाडू चंदाराणी कांबळे यांची महाराष्ट्र १९ वर्षाखालील व खुला गट महिला संघाच्या संघव्यवस्थापकपदी निवड झाली आहे.